9. नवीन भागात ब्रँच काढून व्यवसाय वाढवण्याचा विचार आहे ,तर एकापेक्षा जास्त शाखांचे कामकाज कसे करावे?

व्यवसायाच्या नव्या शाखा किंवा ब्रँचेस काढणे हे आधीच्या काळाच्या तुलनेत सध्या बरेच सोपे झाले आहे. परंतु, त्यासाठी पुढील मूलभूत गोष्टी स्वीकारणे महत्त्वाचे ठरते.
- बॅक ऑफिस (मेन ऑफिस) अधिक सक्षम करणे.
- बॅक ऑफिसमधून ब्रँचेसना उत्तम पाठबळ (सपोर्ट) देत रहा.
- उच्चतम एच. आर. पॉलिसी अमलात आणणे.
- मालकाच्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा शाखांमधून तेवढीच उत्तम ग्राहक सेवा देण्यासाठी विशेष प्रयत्न करा.
- ब्रँचेसवर चांगले नियंत्रण ठेवणे.
- शाखांमधून ठरवलेल्या पद्धतीनेच कामकाज व्हावे यासाठी SOP किंवा आदर्श पद्धती आखणे.
- सुरळीत कामकाजासाठी उत्तम व्यवस्थापन अमलात आणा.
अर्थात, नवीन शाखा सुरू करण्यासाठी स्ट्राँग बॅक ऑफिस, चांगली एच. आर. पॉलिसी, शाखांवरील नियंत्रणासाठी कंट्रोल्स आणि शाखांच्या कामकाजासाठी प्रमाणित पद्धती, या चार गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. आणि यासाठी ॲक्मे इन्फिनिटीमध्ये ब्रँच मॅनेजमेंट अंतर्गत निरनिराळी वैशिष्ट्ये दिली आहेत; जी पुढीलप्रमाणे काम करतात.
- बॅक ऑफिस (मेन ऑफिस) अधिक सक्षम करण्यासाठी…
- सेंट्रलाइज्ड; कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट, कस्टमर फीडबॅक मेकॅनिझम, परचेसिंग, बार कोडिंग, फायनांशियल अकाउंटिंग अशा सोई आणि मोड्यूल्स इन्फिनिटीमध्ये उपलब्ध आहेत.
- सॉफ्टवेअरमधून मल्टिपल लोकेशन्स किंवा ब्रँचेस तयार करता येतात आणि उपयोगकर्त्यांना (युजर्सना) त्या पद्धतीने अधिकार देता येतात.
- कोणतेही अहवाल, उपयोगकर्त्यांचे अधिकार, हुद्दा; शाखांनुसार किंवा एकत्रित बघता येतात.
- अशा वैशिष्ट्यांमुळे बॅक ऑफिस एकदम पॉवरफूल बनते आणि निरनिराळ्या ठिकाणी शाखा काढणे सोपे जाते.

- उच्चतम एच. आर. पॉलिसी अमलात आणण्यासाठी…
- सेल्समनना इन्सेन्टिव्ह देऊन, त्यांना ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी आणि जास्तीत जास्त माल विकण्यासाठी प्रवृत्त करता येते. जसे…
- आयटम किंवा कॅटेगरीवर इन्सेन्टिव्ह.
- एखाद्या शाखेचे विक्रीचे लक्ष्य ठरवून त्या पद्धतीने इन्सेन्टिव्ह देता येतात.
- कलर स्टोन किंवा डायमंडच्या बाबतीत लूज विकले तर वेगळा इन्सेन्टिव्ह आणि तोच स्टडेडमध्ये विकला तर वेगळा इन्सेन्टिव्ह.
- MRP आयटमवर वेगळे इन्सेन्टिव्हज, इत्यादि.
- ओल्ड गोल्ड पर्चेसमध्ये होणाऱ्या नफ्यावरती इन्फिनिटी योग्य पद्धतीने लक्ष ठेवते.
- ग्राहकसेवेचा दर्जा, बॅक ऑफिसच्या कॉल सेंटरमधून किंवा काऊंटरवर ग्राहकाची प्रतिक्रिया घेऊन तपासता येतो. कॉल सेंटरमध्ये फीडबॅक घेताना ग्राहकाला विचारायचे प्रश्न इन्फिनिटीमध्ये सेट करून ठेवता येतात.
- कॉल सेंटरचे कॉल रेकॉर्ड करून, त्यात जर काही त्रुटी असेल तर ते सेल्समनला ऐकवता येतात.
- इन्फिनिटीच्या स्वतंत्र HR मोड्यूलमध्ये ऑर्गनायझेशन चार्ट, कर्मचार्यांची नेमणूक, अप्रायझल सिस्टिम, KPI अशा सुविधा दिलेल्या आहेत.
- अशा तऱ्हेने चांगले काम करण्यासाठी आणि ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी सेल्समनना प्रेरित करता येते. त्यामुळे विविध शाखा असल्या तरी, बँकेप्रमाणे ओनरलेस कामकाज होत राहते. अर्थात, दुकानात मालक असताना जशी सेवा ग्राहकाला मिळते तशीच सेवा मालकाच्या अनुपस्थितीतही सेल्समन देत राहतात.
- ब्रँचेसवर चांगले नियंत्रण ठेवण्यासाठी…
- सर्व शाखा हेड ऑफिसशी नेटवर्कमधून जोडता येतात.
- ब्रँचमधील प्रत्येक व्यवहार रिअल टाईममध्ये (लगेचच) हेड ऑफिसला त्याच्या इफेक्टसह परावर्तित होतो.
- ऑथोरायझेशन प्रोसेस आहे.
- एक माणूस एखादी एन्ट्री करतो आणि दुसरा ती पास करतो किंवा ऑथोराइझ करतो अशी ’मेकर चेकर’ संकल्पनाही अमलात आणता येते. उदा. एखाद्या ऑर्नामेंटचे ब्रेकिंग केले म्हणजे ग्राहकाने नेकलेस मधील पेंडेंट घेतले नाही फक्त चेनच घेतली (RNG) तर त्याचे ऑथोरायझेशन दुसर्या काऊंटरवरती लगेच होते.
- दिवसाच्या शेवटी, प्रत्येक ब्रँचचा डे एंड ठरवलेल्या प्रोसेसमधून करता येतो.
- ब्रँचेसच्या बाबतीतील सर्व रिपोर्टींग हेड ऑफिसला ऑटो मिळत राहते.
- कंट्रोलसाठी सर्व रिपोर्टिंग आणि ऑथोराइझेशन मोबाईलवर उपलब्ध आहे.
- इन्फिनिटीमधील इनट्रान्झिट लोकेशनच्या व्यवस्थापनामुळे, स्टॉक ट्रान्सफर किंवा ब्रँच ट्रान्सफरमध्ये सुसूत्रता येते.
- सॉफ्टवेअरमध्ये उपयोगकर्त्यानुसार, रोलनुसार, सिक्युरिटी सिस्टिम कार्यान्वित करता येते.
- ब्रँचची ऑर्डर रिक्विजिशन आपोआप तयार होण्यासाठी ब्रँचच्या सेलनुसार, आयटमनुसार, कॅटेगरीनुसार, वेट रेंजनुसार रिऑर्डर लेव्हल सेट करता येते.

- शाखांमधून ठरवलेल्या पद्धतीनेच कामकाज होण्यासाठी….
- निरनिराळ्या ब्रँचेसमधून समान पॉलिसी कार्यान्वित करता येते. जसे मेटल रेट किंवा मेकिंग चार्जेस अथवा डिस्काउंट पासिंगची पॉलिसी इत्यादी.
- सर्व पॉलिसी डिसिजन हेड ऑफिसमधून सॉफ्टवेअरमध्ये सेट करता येतात. उदा. एखाद्या विशिष्ट ब्रँचचा गोल्ड रेट काय असायला हवा? हे हेड ऑफिसमधून एखादे सूत्र ठरवून त्याप्रमाणे सेट करता येते. किंवा याचप्रमाणे एकच बार कोड लेबल वेगवेगळ्या ब्रँचेसमध्ये वेगवेगळ्या मेकिंग चार्जेसला देता येते. अशाच प्रकारे रेट फ्रीझ करायचा असेल तर ॲडव्हान्सची विशिष्ट रक्क्म भरल्यानंतर संबंधित रेट फ्रीझ होईल अशी पॉलिसी सर्व शाखांमधून सेट करून ठेवता येते.
- इन्फिनिटीच्या वर्क फ्लो मोड्यूलमध्ये SOP प्रमाणे करावयाच्या निरनिराळ्या प्रोसेसचे वर्क फ्लो डिफाईन करता येतात आणि कार्यान्वितही करता येतात.

एकंदरितच शाखा विस्तार करायचा तर शाखेसाठी जी पद्धती किंवा पॉलिसी ठरवू ती कार्यान्वित करण्याची क्षमता ॲक्मे इन्फिनिटीमध्ये आहे. म्हणूनच नवीन ब्रँच काढून व्यवसाय वाढवण्याचा विचार असेल तर एकापेक्षा जास्त शाखांचे कामकाज करण्यासाठी ॲक्मे इन्फिनिटी हे सुयोग्य सॉफ्टवेअर आहे.
Leave A Comment