8. मुहूर्ताच्या दिवशी ग्राहकांची एकच गर्दी होत असल्याने धांदल उडते. अशी गर्दी सुरळीतपणे हाताळण्याचे काही मार्ग आहेत का?
नक्कीच आहेत!! परंतु यासाठी दुकानातल्या कामकाजांच्या पिढीजात पद्धतींमध्ये बदल करणे ही पहिली पायरी ठरते. त्यानंतर पुढील पद्धती अमलात आणून ग्राहकांची गर्दी सुरळीतपणे हाताळता येते.
- नवीन काऊंटर्स तयार करणे.
- कामाप्रमाणे जास्तीत जास्त काऊंटर्स तयार करा.
- सणाच्या दिवशीसुद्धा केवळ त्या दिवसापुरते नवीन काऊंटर्स तयार करा. जसे, सेव्हिंग स्कीमसाठी वेगळा काऊंटर, स्टॅन्डर्ड बार, कॉईन्स आणि वेढण्यासाठी वेगळा काऊंटर इत्यादी.
- असे नवीन काऊंटर्स तयार केल्याने जी ती गर्दी ज्या त्या काऊंटर वर जाते आणि विभाजित होते. त्यामुळे ग्राहकांना त्यांचे काम पटकन करून चटकन मोकळे होता येते.
- थोडे थोडे काम प्रत्येकाने वेगाने करणे.
- कामांची विभागणी करून जी ती कामे संबंधित व्यक्तींकडे सुपूर्द करा.
- हातातले काम चटकन संपवा आणि पुढच्या पूर्ततेसाठी ते दुसर्याकडे तत्काळ देऊन टाका.
- अशा रितीने एका माणसाला लागणारा वेळ कमी होऊन ग्राहकाला चटकन मोकळे करता येते.
- सेल्स-काऊंटरवरती सेल्समनचा वेळ वाचेल अशा उपाययोजना करणे. यामुळे प्रामुख्याने गर्दीच्या वेळी एकत्रित भरपूर वेळ वाचू शकतो.
- डिलिव्हरी आणि बिलिंग काऊंटरवर ग्राहकाला लवकर मोकळे करण्याची सोय करणे.
- खरेतर ग्राहकाला चटकन पैसे देऊन जाण्याची घाई असते आणि असे केल्याने तो बिलिंग काऊंटरवर लवकर मोकळा होऊन अधिक खुष होत असतो.
आता हीच चार कामे दुकानात अगदी सहज कार्यान्वित करण्यासाठी अॅक्मे इन्फिनिटीमध्ये भरपूर फीचर्स उपलब्ध आहेत.
- नवीन काऊंटर्स तयार करण्यासाठी…
- खूप सोपी प्रोसेस आहे. यामधून सॉफ्टवेअरमध्ये केव्हाही नवीन लोकेशन तयार करता येते. संबंधित लोकेशनला; केवळ आवश्यक तेच डॉक्युमेंट उपलब्ध करून देता येतात, ज्यामुळे कामे वेगाने होतात.
- अशा लोकेशनचे सर्व कामकाज स्वतंत्रपणे करता येते. सदर कामकाज ऑफलाईन मोडमध्ये (कॉम्प्युटर मेन सिस्टीमला न जोडता) करणेसुद्धा शक्य आहे.
- फास्ट बिलिंगच्या एका वैशिष्ट्यपूर्ण पर्यायामुळे ठराविक आयटम जलद (वेगाने) विकता येतात. उदा. वेढणे. असे काऊंटर हे ऑफलाईन अर्थात दुकानाच्या बाहेरसुद्धा तयार करता येते.
- अशा तऱ्हेने स्वतंत्र काऊंटर्स केल्यामुळे गर्दीचा मोठा भाग ज्या त्या काऊंटरकडे वळतो ज्यामुळे गर्दीच्या वेळीही उत्तम नियंत्रण मिळवता येते.
- थोडे थोडे काम प्रत्येकाने वेगाने करण्यासाठी…
- कामे छोटया-छोटया भागामध्ये विभागून ती चटकन पूर्ण करण्यासाठी काऊंटर मॅनेजमेंटची सिस्टीम सॉफ्टवेअरमध्ये दिलेली आहे. उदा. डिलिव्हरी काऊंटरवर दागिने पसंद पडल्यावर सेल्समन केवळ डिलिव्हरी स्लीप/नोट तयार करतो. ती डिलिव्हरी स्लीप बिलिंग काऊंटरला येते. बिलिंग काऊंटरवरती फक्त बिल तयार केले जाते. तेही जलद होते कारण डिलिव्हरी स्लीपमधून सगळ्या आयटमचे फीडिंग आधीच झालेले असते. जेव्हा ग्राहक पेमेंटसाठी कॅशिअर काऊंटरला येतो तेव्हा कॅशिअर केवळ बिलावरील बार कोड स्कॅन करून पेमेंटचे कामकाज पूर्ण करतो. अशा पद्धतीने कामाची विभागणी करून काम चटकन संपवता येते.
- काऊंटर मॅनेजमेंटमधून ओल्ड गोल्ड आणि ऑर्डरसाठीही स्वतंत्र काऊंटर्स तयार करता येतात.
- काऊंटर मॅनेजमेंटमुळे दुकानातील कामाचा फ्लो व्यवस्थित राहतो. याशिवाय एके ठिकाणी काम तुंबून राहणे, अडकून राहणे अशा स्वरूपात वेळही वाया जात नाही.
- सेल्स-काऊंटरवरती सेल्समनचा वेळ वाचेल अशा उपाययोजना करण्यासाठी…
- सेल्समन डिलिव्हरी नोट कॉम्प्युटरवर न काढता, ॲपमधून थेट मोबाईलवरून काढू शकतो.
- ग्राहकाला मोबाईलवरच लेबलचे मूल्यांकन (व्हॅल्युएशन) चटचट दाखवता येते, ज्यामुळे कॅलक्यूलेटरवरचा हिशेबाचा वेळ वाचतो.
- ऑर्नामेंटचे पूर्ण डिटेल्स फोटोसह मोबाईलवरच ग्राहकाला दाखवता येतात.
- ऑर्डर डिलिव्हरी नोटमध्ये कस्टमरचे नाव चटकन फीड करता येते. केवळ मोबाईल नंबर टाकून ग्राहकाची माहिती ऑटो येत असल्यामुळे काही सेकंदांमध्ये ग्राहक निवडणे शक्य होते.
- अशा तऱ्हेने काऊंटरवरती, व्हॅल्युएशन, डिलिव्हरी नोट तयार करणे इत्यादी कामे मोबाईलवरून होत असल्यामुळे सेल्समनचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचतो.
- डिलिव्हरी आणि बिलिंग काऊंटरवरती; ग्राहकाला लवकर मोकळे करण्यासाठी…
- केवळ मोबाईल नंबर टाकून ग्राहकाला अॅक्सेस करता येते. किंवा पॅन नंबर अथवा नावाची पहिली काही कॅरेक्टर्स टाकून ग्राहक निवडता येतो.
- बिलाचा पेमेंट मोड स्वतंत्रपणे केव्हाही बदलता येतो.
- डिस्काऊंट देण्यासाठी उचित वर्क फ्लो असल्यामुळे आणि कॉम्प्युटरवरूनच ऑथोरायझेशन होत असल्यामुळे, डिस्काऊंटच्या कामासाठी प्रत्यक्षात एका जागेवरून दुसर्या जागेवरती उठून जावे लागत नाही.
- ओल्ड गोल्डसाठी स्वतंत्र काऊंटर असल्यामुळे डिलिव्हरी नोट किंवा बिलिंगवरती त्याच्या गर्दीचा ताण येत नाही.
- डिलिव्हरी झाल्यानंतर ग्राहकांची प्रतिक्रिया घेण्यासाठी कॉल सेंटरची सुविधा असल्यामुळे दुकानातच कस्टमर फीडबॅक घेण्यामध्ये वेगळा वेळ जात नाही.
अशा तऱ्हेने, अॅक्मे इन्फिनिटीच्या मदतीने नवीन काऊंटर्स तयार करून, विभागून आलेली छोटी छोटी कामे प्रत्येकाने वेगाने करून आणि सेल्स-काऊंटरवरती सेल्समनचा वेळ वाचल्याने, शिवाय डिलिव्हरी आणि बिलिंग काऊंटरवरुन ग्राहकाला लवकर मोकळे केल्याने गर्दीच्या वेळीसुद्धा धांदल उडत नाही.
Leave A Comment