7. रात्री दुकान बंद करतानाचे कामकाज वेळखाऊ होते, त्यामुळे सर्वानाच घरी जायला उशीर होतो. हे टाळता येते का?
हो! टाळता येते!! खरंतर, ज्वेलरी व्यवसायात दिवसाच्या शेवटी करायच्या कामांची संख्या इतर व्यवसायांच्या तुलनेने जास्त असते. जसे, दररोजचा प्रत्येक काउंटरचा, ऑर्डर पेटीचा, डिसअसेंबल झालेल्या छोट्या छोट्या आयटम्सचा आणि ओल्ड गोल्डचा स्टॉक जुळवणे; शिवाय दररोजची कॅश, आलेले चेक्स, क्रेडिट कार्डच्या मशीनवरचे रिपोर्ट जुळवणे इत्यादी. ही सर्व कामे वेगवेगळ्या काउंटरवर करण्याची असल्यामुळे आणि दिवसातला प्रत्येक व्यवहार अन व्यवहार तपासायचा असल्याने, दुकान बंद करायला वेळ होतोच. शिवाय, या प्रत्येक कामामध्ये थोडा थोडा जरी वेळ जास्त लागला तरी एकूणच वेळ जास्त लागतो. त्यामुळे दुकान बंद करतानाचा हा वेळ जर वाचवायचा असेल तर पुढील गोष्टी करणे गरजेचे आहे.
- कॅशिअरची कॅश जुळवण्यासाठी एखादी सुव्यवस्थित कार्यपद्धती तयार करणे.
- ज्या ज्या वेळी कॅशिअर कॅश देतो किंवा घेतो तेव्हा तेव्हा त्याची अचूक नोंद करा.
- प्रत्येक कॅशिअरच्या रोख व्यवहाराची नोंद केल्यावर लगेचच त्याच्या पुढे त्यांचा बॅलन्स लिहून ठेवा.
- असे केल्यामुळे ज्या त्या कॅशिअरची कॅश चटकन कळून येते शिवाय कॅशचे कामही सोपे होते.
- प्रत्येक काउंटरवरचा सेल्सचा स्टॉक चटकन कळण्यासाठी एखादी मेथड सेट करणे.
- प्रत्येक विक्री झाल्यानंतर ज्या त्या विक्रीच्या नोंदीबरोबर आयटमचा बॅलन्स लिहून ठेवा.
- दिवसाच्या शेवटी सर्व आयटम मोजून तो स्टॉक रिपोर्टशी टॅली करा.
- डे एंड योग्य पद्धतीने करायची सुरळीत प्रोसेस कार्यान्वित करणे.
- दिवसाच्या सुरुवातीला कॅशियरकडे ठरवून दिलेली रक्कमच ठेवा.
- दिवसाच्या शेवटी, एकेका विभागाचे काम पूर्ण करत जा.
- व्यवहार होतेवेळी घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या त्या वेळी तपासणे.
- व्यवहारांमधील स्टॉक आणि कॅश मुव्हमेन्टचा त्या त्या वेळेला ट्रॅक ठेवा.
- ग्राहकाला दिले जाणारे डिस्काउंट किंवा जुन्या सोन्याची प्युरिटी, नोंद करते वेळीच तपासून घ्या.
ॲक्मे इन्फिनिटीमध्ये ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी सोईस्कर पद्धती दिलेल्या आहेत ज्या पुढीलप्रमाणे काम करतात.
- कॅशिअरची कॅश जुळवणारी एखादी सुव्यवस्थित कार्यपद्धती तयार करण्यासाठी…
- ॲक्मे इन्फिनिटीमध्ये कॅशिअर मोड्यूल आहे, ज्यामध्ये झालेला प्रत्येक व्यवहार कॅशिअरला ऑथोराईज किंवा पास करता येतो.
- ज्या वेळेला कॅशिअर पैसे देतो किंवा घेतो त्या वेळेला संबंधित व्यवहार पास करून त्या व्यवहाराची नोंद कॅशिअर काही सेकंदातच करू शकतो, ज्यामुळे कॅश टॅली करण्याचे काम सुरळीत होते.
- कॅशिअरचे सर्व कामकाज कॅशिअरनुसार करायची सोय आहे. त्यामुळे उपलब्ध कॅशिअर्सपैकी कोणालाही लवकर जायचे असेल तरी सुद्धा त्याची कॅश तशी टॅली करून त्यांना मोकळे करता येते.
- प्रत्येक काउंटरवरचा सेल्सचा स्टॉक चटकन कळण्यासाठी…
- आयटमनुसार स्टॉक समरी रिपोर्टमध्ये, प्रत्येक आयटमच्या बाबतीत संबंधित आयटमचे ओपनिंग, त्या दिवशी काउंटरवर आलेले आयटम, त्यातून विक्री झालेले आयटम आणि क्लोजिंग लगेचच कळते.
- आयटमनुसार स्टॉक समरी रिपोर्ट हा कॅटॅगिरीनुसारही मिळतो.
- स्टॉक चेकिंग करताना आयटम मर्जिंगही करता येते. उदा. जर दुकानामध्ये 22 कॅरेट आणि 23 कॅरेट अशा दोन्ही कॅरेटच्या बांगड्या असतील तर त्यांची कन्सॉलिडेटेड, अर्थात एकत्रित संख्या मिळू शकते.
- सेटच्या आयटमचा स्टॉक, एमआरपी आयटमचा स्टॉक (विथ व्हॅल्यू) स्वतंत्र मिळतो. स्टॉक रिपोर्ट लोकेशननुसार सुद्धा मिळतात. यामध्ये संबंधित लोकेशनवर ड्रिल डाउन करून व्यवहाराच्या लेव्हलपर्यंत जाता येते. एखाद्या आयटमचा विशिष्ट लोकेशनचा स्टॉक लेबलनुसारही मिळतो.
- सेल्समन त्याच्या काउंटरवरचा स्टॉक मोजून ती संख्या कॉम्प्युटरला फीड करतो आणि कॉम्प्युटर ऑटोमॅटिकली ती पडताळून (टॅली करून) घेतो. मग सेल्समन स्वतःला लॉक करतो.
- या सर्व गोष्टींमुळे सेल्समनला डे एंडला काउंटरवरती स्टॉक कमी वेळात टॅली करणे सहज शक्य होते.
- डे बिगिन आणि डे एंड योग्य पद्धतीने करणारी सुरळीत प्रोसेस कार्यान्वित करण्यासाठी…
- डे एंड मोडयूलमध्ये दिवसाच्या सुरुवातीला कॅशिअरकडे कॅश देता येते आणि दिवसाचा रेट सेट करता येतो. त्यानंतर संबंधित दिवसासाठी, सॉफ्टवेअरमध्ये डे बिगिन होतो.
- यानंतर होणारे सर्व व्यवहार कॅशिअरला पासिंगला जात असतात. आणि कॅशिअरने पास केल्यावर संबंधित कॅशिअरची शिल्लक कमी जास्त होत असते. सर्व व्यवहारांचे इन्व्हेंट्री इफेक्टसुद्धा ऑटोमॅटिक पडत असतात.
- प्रत्येक काउंटरचा किंवा लोकेशनचा आयटमनुसार, पॅकेटनुसार, लेबलनुसार स्टॉक रिपोर्ट ऑटोमॅटिक मिळतो.
- डे एन्डला व्यवहारांच्या नोंदी व्यवस्थित झालेल्या आहेत ना? याची खात्री करून घेतल्यावरच सेल्समन त्याचा क्लोजिंग स्टॉक भरतो आणि पहिल्यांदा सेल्समन लॉक केला जातो. याचप्रमाणे कॅशिअरलाही त्याचा कॅश बॅलन्स टाकून लॉक केले जाते. अशा तऱ्हेने ब्रँच पद्धतशीरपणे बंद (क्लोज) होते.
- हे सर्व कामकाज ऑथोरियझेशन/ऑडिटिंग मेथड्सने होत असते ज्यामुळे छोट्या छोट्या चुका टाळल्या जातात. दिवसभरामध्ये घडलेल्या छोट्या छोट्या व्यवहारांचे पासिंग डे एन्डला करता येते.
- या सर्व सुविधांमुळे डे एन्डची प्रोसेस सुरळीत, सुटसुटीत तर होतेच शिवाय कमी वेळात पूर्ण होते.
- व्यवहार होतेवेळी घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या त्या वेळी तपासण्यासाठी…
- कुठलाही व्यवहार झाल्यानंतर लगेचच त्याचे पासिंग करता येते. उदा. दिवसभरात काउंटरवरती, डिस्काऊंट दिलेली सर्व बिले दिवसाच्या शेवटी चेक करण्याऐवजी, काउंटरवर डिस्काऊंट दिल्या दिल्या तो पासिंगला येतो. आणि जोपर्यंत ओनर किंवा मॅनेजर ते पास करत नाही तोपर्यंत त्या बिलाची प्रिंट निघत नाही.
- हे डिस्काऊंट ओनर मोबाईल ॲपमध्येसुद्धा पासिंगला उपलब्ध असतात. त्यामुळे दुकान मालक नेहमी दुकानात उपलब्ध असणे गरजेचे नसते.
- अशा पद्धतीमुळे, व्यवहार करतानाच त्या व्यवहाराची सत्यता किंवा सदर व्यवहार व्यवस्थित केला आहे की नाही हे तपासले जात असल्यामुळे दिवसाच्या शेवटीचे एकदम करायचे काम कमी होऊन वेळ वाचतो.
अशा पद्धतीने कॅशियर मोड्यूल, सेल्समन लॉकिंग, सेल्समनचे स्टॉक टेकिंग त्याचप्रमाणे सुटसुटीत डे एंड प्रोसेस आणि सतत ऑथोरायजेशन किंवा पासिंगची सोय या सुविधांमुळे ॲक्मे इन्फिनिटीमध्ये दिवसाच्या शेवटी कमीत कमी वेळात कॅश, ओल्ड गोल्ड, ऑर्डरचा स्टॉक काउंटरवरचा स्टॉक, डिसअसेंबल झालेल्या छोट्या छोट्या आयटमची डिलिव्हरी, दिलेले चेक्स, दिलेले क्रेडिट्स डिस्काउंट्स आणि त्याच बरोबर क्रेडिट कार्ड्स, या सर्वांचा अचूक हिशोब लावून लवकरात लवकर घरी जाणे शक्य होते.
शेवटी… घरी लवकर पोहचणे महत्त्वाचे!
Leave A Comment