ज्वेलरी व्यवसाय वाढवायचा तर …… प्रश्नांची उत्तरे शोधायला हवीत!
अशीच काही; ज्वेलरी व्यवसायवृद्धीसाठी उपयुक्त प्रश्नोत्तरे

स्पर्धेच्या युगामध्ये आपले सध्याचे ग्राहक आपल्याशी बांधलेले राहण्यासाठी ग्राहकांशी असलेले हितसंबंध अधिक दृढ करण्याची आवश्यकता असते, जे काम मुख्यत्वे चार प्रकारे केले जाऊ शकते;

  1. ग्राहकांना जास्तीत जास्त समजून घेणे.
  • ग्राहकांची इत्थंभूत माहिती गोळा करा.
  • ग्राहकांच्या माहितीचे उत्तम विश्लेषण करा.
  • ग्राहकांच्या आवडी-निवडी ओळखा.
  1. दुकानात ग्राहकांना पावलोपावली उत्तम सेवा देणे.
  • दुकानासंदर्भात ग्राहक जी काही कृती करतात, त्या कृतीमध्ये प्रत्येक ठिकाणी ग्राहकाला उत्तम अनुभव मिळेल यासाठी प्रयत्नशील रहा.
  1. ग्राहकांकरिता फायदेशीर/सुखकारक योजना राबवणे.
  • जसे, सेव्हिंग स्कीम, गिफ्ट व्हाऊचर, लॉयल्टी प्रोग्राम इत्यादी.
  1. ग्राहकांना दुकानाबाबत सातत्याने अपडेटेड ठेवणे.
  • नियमित सीआरएम कॅम्पेन राबवून किंवा ग्राहकांशी संवाद साधून, त्यांच्यामध्ये दुकानाबद्दल जवळीक निर्माण करा, जेणेकरून ते दुकानात येण्यासाठी प्रवृत्त होतील.

यासाठी ॲक्मे इन्फिनिटीमध्ये कस्टमर रिलेशनशिप मोड्यूल (सीआरएम) उपलब्ध आहे; जे दुकानांच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार, वेगवेगळ्या पद्धतीने कार्यान्वित करता येते. वरील चारही मुद्द्यांसंदर्भात इन्फिनिटीचे सीआरएम मोड्यूल पुढीलप्रमाणे काम करते.

  1. ग्राहकांना जास्तीत जास्त समजून घेण्यासाठी…
  • ॲक्मे इन्फिनिटी ग्राहकांची इत्थंभूत माहिती; जसे नाव, पत्ता, ई-मेल, फोन नं., मोबाईल नं., जन्मदिवस, लग्नाचा वाढदिवस, त्यांचे मूळ स्थान इत्यादि, व्यवस्थित सेव्ह करून ठेवते.
  • आपल्याकडून खरेदी केलेले दागिने वस्तूत: कोण वापरणार आहे हे ही सॉफ्टवेअर सेव्ह करते.
  • विक्रीच्या माहितीवरून कोणत्या प्रकारचा ग्राहक, कोणत्या प्रकारचा माल, कोणत्या कारणासाठी आपल्याकडून खरेदी करतो याचे विश्लेषण करणारे अहवालही सॉफ्टवेअर देते, ज्यावरून ग्राहकांची आवड ओळखण्यास आणि त्यांना समजून घेण्यास मदत होते.
  • इन्फिनिटीमध्ये ग्राहकांची खरेदी क्षमता सांगणारे अहवालसुद्धा उपलब्ध आहेत.
  1. ग्राहकांना पावलोपावली उत्तम सेवा देण्यासाठी…
  • यामध्ये, दुकानात येणाऱ्या ग्राहकांशी जिथे जिथे संवाद साधला जातो, जिथे त्यांच्याशी संबंध येतो आणि जिथे वेगवेगळ्या कृती घडतात, ती वेगवेगळी ठिकाणे नमूद केलेली आहेत; जसे, पार्किंग, दुकानाचा दरवाजा,सेल्स-बिलिंग सारखी काऊंटर्स इत्यादी.
  • अशा प्रत्येक ठिकाणी उत्तम सेवा कशी द्यायची, उत्तर कसे द्यायचे, वर्तणूक कशी असायला हवी आणि उत्तम संवाद कसा साधायचा, याची प्रोसेस किंवा सिस्टिम तुम्ही तयार करू शकता. ही सिस्टिम कार्यान्वित करण्यासाठी इन्फिनिटीमध्ये आवश्यक तो वर्क-फ्लो तयार करता येतो.
  1. ग्राहकांकरिता फायदेशीर/सुखकारक योजना राबवण्यासाठी…
  • यामध्ये सेव्हिंग स्कीम, गोल्ड डिपॉझिट स्कीम, लॉयल्टी स्कीम, गिफ्ट व्हाउचर्स, डिस्काउंट कुपन्स अशा योजनांचा समावेश आहे.
  • या योजनांअंतर्गत, ग्राहकाने केलेल्या छोट्यात छोट्या व्यवहारांचीही व्यवस्थित नोंदणी राहते. जसे सेव्हिंग स्कीमचा नियमित हप्ता किंवा दिलेले PDC (POST DATED CHEQUE) इत्यादी
  • लॉयल्टी प्रोग्राममध्ये ग्राहकाला त्याच्या परिवाराच्या खरेदीचाही मोबदला देता येतो. शिवाय, ग्राहकाला वेगवेगळे डिस्काउंटसुद्धा देता येतात.
  • गिफ्ट व्हाउचरमुळे नियमित ग्राहकांव्यतिरिक्त, बाहेरचे ग्राहक आपल्या दुकानात येण्यास मदत होते. गिफ्ट व्हाउचर्ससाठी निश्चित (स्थिर) किंवा बदलत राहतील अशा दोन्हीही डिनॉमिनेशनचा वापर करता येऊ शकतो.
  1. ग्राहकांना दुकानाबाबत सातत्याने अपडेटेड ठेवण्यासाठी…
  • सॉफ्टवेअरची मदत घेऊन निरनिराळी सीआरएम कॅम्पेन कार्यान्वित करता येतात; जी ग्राहकांनुसार ठराविक किंवा विशेष निकषांवर (ॲट्रीब्युट) आधारित असू शकतात. ठराविक प्रकार किंवा ठराविक गुणधर्म असे निकष लावून सीआरएम कॅम्पेन तयार केल्यावर, संबंधित ग्राहकांसाठी माध्यम काय असायला हवे हे सुद्धा ठरवता येते. सीआरएम कॅम्पेन्स दरम्यान ज्या गुडीज द्यायच्या त्या सॉफ्टवेअरमध्ये नमूद करता येतात.
  • जन्मदिनी किंवा लग्नाच्या वाढदिवसाला अभिनंदनाचे, शुभेच्छांचे एसएमएस पाठवता येतात.
  • सीआरएम कॅम्पेन्सची यशस्विताही तपासता येते.
  • ग्राहककेन्द्रित (सीआरएम) कॅम्पेन्स करता येतात; जसे, आपला एखादा ग्राहक गेल्या वर्षी आपल्याकडच्या एखाद्या योजनेला आलेला नसेल तर त्याला आपण एसएमएस किंवा फोन करून आमंत्रित करू शकतो. किंवा नियमित ग्राहकांनी सेव्हिंग स्कीमचे नूतनीकरण केले नसल्यास तसा टो फिल्टर लावून, ग्राहकांची यादी तयार करता येते. त्यांना फोन करून नवीन स्कीम चालू करण्याबाबत प्रोत्साहन देता येते.

अशा पद्धतीने, ॲक्मे इन्फिनिटी सॉफ्टवेअरमधून, ग्राहकांच्या माहितीचे व्यवस्थापन आणि विश्लेषण करून ग्राहकाला समजून घेणे, त्याला दुकानात आल्यावर पद्धतशीरपणे पावलोपावली उत्तम सेवा देणे, नवनवीन ग्राहकोपयोगी योजना राबवणे आणि नंतर ग्राहकेन्द्रित (सीआरएम) कॅम्पेन्स राबवून त्यांना वारवांर दुकानात येण्यासाठी प्रवृत्त करणे, अशा प्रयत्नातून उत्तम ग्राहक हितसंबंध तयारही करता येतात आणि जपताही येतात.

शेवटी…. ग्राहक देवो भव:।

ज्वेलरी व्यवसायातील छोट्या छोट्या जटिल व्यवहारांमुळे या धंद्यातील प्रॉफिटॅबिलिटी चटकन काढणे हे अवघड आहे खरे! परंतु काही अहवालांकडे किंवा स्टेटमेंट्सकडे लक्ष दिल्यास आणि त्यानुसार अभ्यासपूर्वक अंमलबजावणी केल्यास व्यवसायातील प्रॉफिटॅबिलिटी नुसती कळून येत नाही तर ती वाढण्यासही नक्कीच मदत मिळते. म्हणूनच तुम्ही वेगवेगळे अहवाल सातत्याने तपासत राहिले पाहिजेत.

  1. ट्रेडिंग अकाउंटमधून ग्रॉस प्रॉफिट वेळोवेळी तपासत राहणे.
  • जटिलपणामुळे ज्वेलरी व्यवसायामध्ये तयार करायला किचकट असे ट्रेडिंग अकाउंट, पद्धतशीरपणे; जास्तीत जास्त सुटसुटीत बनवत रहा.
  • ग्रॉस प्रॉफिटच्या टक्केवारीनुसार वेगवेगळी ट्रेडिंग अकाउंट तयार करा.
  • वरील छोट्या स्टेप्स घेतल्याने ज्वेलरी व्यवसायाची प्रॉफिटॅबिलिटी जास्त चांगल्या तऱ्हेने आणि सोप्या पद्धतीने समजत राहते.
  1. ज्वेलरीमधील इन्व्हेंटरी खूप कॉस्टली असल्यामुळे; प्रॉफिटॅबिलिटीकरिता कॅश फ्लो वर सुद्धा लक्ष ठेवणे.
  1. प्रत्येक बिलामध्ये होणारा ग्रॉस प्रॉफिट कळावा अशी सोय करणे.
  • दागिना आल्यानंतर तो विकला जाईपर्यंत सर्व कामे एका सुसूत्र साखळी पद्धतीमध्ये बांधा.
  • इन्व्हेंटरीमधील कुठल्या आयटम्स मध्ये काय प्रॉफिटॅबिलिटी आहे हे शोधून काढा. उदा. ऑर्नामेंट किती रुपयाला आले, किती रुपयाला विकले इत्यादी.
  1. प्रॉफिटॅबिलिटीमध्ये इन्व्हेन्टरी कॅरिंग डेजचेही कन्सिडरेशन करणे.
  • मायक्रो लेव्हलला कोणत्याही इन्व्हेन्टरीची, इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्ट म्हणजे सदर दागिना दुकानात किती दिवस होता हे तपासा.
  • व्यवसायात इन्व्हेंटरी किती वेळा रोटेट होते किंवा ज्वेलरीचा इन्व्हेंटरी टर्न ओव्हर रेशो काय आहे यावरही लक्ष ठेवा. यामुळे किती इंटरेस्ट लॉस किंवा ऑपॉर्च्युनिटी लॉस झाला हे पण लक्षात येते.

एकंदरीतच, ज्वेलरी व्यवसायातील प्रॉफिटॅबिलिटी तपासायची तर जटिल व्यवहारांच्या अचूक नोंदी ठेवणे, ट्रॅडीशनल बुक्स ऑफ अकाउंटिंगमधून ग्रॉस प्रॉफिट पाहणे, प्रॉफिटॅबिलिटीसाठी ॲडव्हान्स अकाउंटिंगमधील कॅश फ्लोसारख्या स्टेटमेंट्सवर लक्ष ठेवणे, शिवाय इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्टसह प्रत्येक ऑर्नामेंटमध्ये किती ग्रॉस प्रॉफिट झाला आणि इन्व्हेंटरीचे किती टर्न होतात यांचे अहवालही बघणे गरजेचे असते.

हे सर्व योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी ॲक्मे इन्फिनिटीमध्ये, ज्वेलरी व्यवसायातील छोट्या छोट्या आणि किचकट, तसेच जटिल व्यवहारांची तपशीलवार नोंद ठेवण्याची सोय दिली आहे, ज्याचे ते अचूक अकाउंटिंगही करते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते या सर्व नोंदींचे पोस्टिंग किंवा रूपांतरण; प्रॉफिटॅबिलिटी सहज समजेल अशा अहवालांमध्ये करते जे पुढीलप्रमाणे आहे.

  1. ट्रेडिंग अकाउंटमधून ग्रॉस प्रॉफिट वेळोवेळी तपासत राहण्यासाठी…
  • ज्वेलरी व्यवसायाचे तयार करायला किचकट असे ट्रेडिंग अकाउंट, ॲक्मे इन्फिनिटी; सहज आणि पद्धतशीरपणे जास्तीत जास्त सुटसुटीत प्रकारे तयार करते.
  • इन्फिनिटीमध्ये वेगेवगळी ट्रेडिंग अकाउंट तयार करता येतात. जसे… स्टँडर्ड बार, 22 कॅरेट ऑर्नामेंट, 18 कॅरेट ऑर्नामेंट, डायमंड ज्वेलरी, MRP किंवा गिफ्ट आर्टिकल, लुज डायमंड, ओल्ड गोल्ड किंवा ओल्ड सिल्व्हर इत्यादींचे वेगवेगळे ट्रेडिंग अकाउंट. यामुळे प्रत्येक विभागातील प्रॉफिटॅबिलिटीचा स्वतंत्रपणे अंदाज येत राहतो.
  • कारागिराच्या किंवा मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस संदर्भात, ट्रेडिंग अकाउंटमध्ये, 24 कॅरेट इश्यू गोल्ड, गोल्डस्मिथ इश्यू रिसिट, वर्क इन प्रोग्रेस शिवाय कारागिराकडे किंवा सबकॉन्ट्रॅक्टरकडे दिलेले इतर मटेरिअल अशा सर्व गोष्टींचा अंतर्भाव केला जातो.
  • ट्रेडिंग अकाउंटमध्ये, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये होणारा प्रॉफिट-लॉस आणि तूट-वेस्टेजचा हिशेबसुद्धा लक्षात घेतला जातो.
  • ट्रेडिंग अकाउंटमध्ये, कन्व्हर्जनच्या नोंदीसुद्धा योग्य पद्धतीने परावर्तित होतात. जसे, ओल्ड गोल्डमधून काही आयटम न्यू गोल्डमध्ये टाकणे किंवा न्यू गोल्डमधील काही आयटम ओल्ड गोल्डमध्ये रूपांतरित करणे इत्यादि.
  • ट्रेडिंग अकाउंट केवळ अमाऊंटमध्ये न मिळता वेटमध्ये सुद्धा मिळते. म्हणजेच व्हॅल्युएशनसाठी ट्रेडिंग अकाउंटच्या दोन मेथड्स उपलब्ध आहेत. 1. वेटेड व्हरेज मेथड आणि 2. करंट रेटने व्हॅल्युएशन.
  • कंपनीच्या ट्रेडिंग अकाउंटबरोबर, प्रत्येक ब्रँचनुसारही वेगवेगळी परंतू परिपूर्ण ट्रेडिंग अकाउंट काढता येतात. ही सुविधा ब्रँच अकाउंटिंगच्या दृष्टीने उपयोगी असते.
  • ट्रेडिंग अकाउंटमध्ये, बुक्स ऑफ अकाउंटचा स्टॉक आणि दुकानातील प्रत्यक्ष स्टॉक यांचे रिकन्सिलीएशन स्टेटमेंटसुद्धा इन्फिनिटीमध्ये उपलब्ध आहे, जे अगदी ज्वेलरी व्यवसायाच्या दृष्टीने अनभिज्ञ व्यक्तीलाही सहज समजू शकते. जसे, बँकेचे अधिकारी वगैरे.
  • नेट प्रॉफिट समजण्यासाठी प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटची सोय इन्फिनिटीमध्ये दिली आहे.
  • ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस ही दोन्ही स्टेटमेंटस सॉफ्टवेअरमध्ये सतत अद्ययावत उपलब्ध असतात.
  • एकंदरीतच, ॲक्मे इन्फिनिटीमध्ये सर्वात व्यापक आणि सर्वसमावेशक पद्धतीचे ट्रेडिंग अकाउंट उपलब्ध आहे जे ज्वेलरी व्यवसायातील प्रॉफिटॅबिलिटी अचूक समोर आणते.
  1. प्रॉफिटॅबिलिटीकरिता कॅश फ्लोवर लक्ष ठेवण्यासाठी…
  • स्वतंत्र कॅश फ्लो स्टेटमेंट इन्फिनिटीमध्ये उपलब्ध आहे.
  • यामध्ये कॅशचा ऑपरेशनल वापर, गुंतवणुकीच्या दृष्टीने केलेला वापर, आर्थिक व्यवहारांसाठी केलेला वापर, वेगवेगळ्या पद्धतीने दर्शविला जातो.
  • यामुळे ॲडव्हान्स अकाउंटिंग युजरला, बिझनेसची प्रॉफिटॅबिलिटी, ही ग्रॉस प्रॉफीट आणि नेट प्रॉफीटच्याही पुढे जाऊन, कॅश फ्लोद्वारेही बघणे शक्य होते.
  1. प्रत्येक बिलामध्ये होणारा ग्रॉस प्रॉफिट कळण्यासाठी…
  • दागिना खरेदी करतेवेळीस किंवा गोल्डस्मिथ रिसीट करतेवेळीस, लेबर चार्जेस, मेकिंग चार्जेस आणि इतर पर्चेस कॉस्ट व्यवस्थित भरण्याची सोय इन्फिनिटीमध्ये आहे. त्यामुळे यावरून बारकोडिंग करताना, सर्व पर्चेस कॉस्ट ऑटो कॅरी फॉरवोर्ड होऊन सिक्युअर्ड पद्धतीने स्टोअर्ड राहतात. त्यामुळे कोणताही दागिना विकल्यानंतर सदर दागिन्याची पर्चेस कॉस्ट काय होती, त्यामध्ये किती ग्रॉस प्रॉफिट मिळाला हे एका सिम्पल रिपोर्टमधून समजत राहते.
  • दागिन्यांच्या संदर्भातील ग्रॉस प्रॉफिटचा अहवाल आयटम कॅटेगरी नुसारही मिळतो.
  1. प्रॉफिटॅबिलिटीमध्ये इन्व्हेन्टरी कॅरिंग डेजचे कन्सिडरेशन करण्यासाठी…
  • दागिन्यांच्या संदर्भातील ग्रॉस प्रॉफिटच्या अहवालांमध्ये इन्व्हेंटरी कॅरिंग डेज दरम्यान; इन्व्हेंटरीवर लागणाऱ्या इंटरेस्टचा सुद्धा हिशेब केला जातो. त्यामुळे प्रत्येक ऑर्नामेंटमागचे ग्रॉस प्रॉफिट अगदी अचूक कळत राहते.
  • दागिन्यांच्या मुव्हमेंटचा प्रॉफिटॅबिलिटीवर होणारा परिणाम पाहण्यासाठी क्लोजिंग स्टॉक व्हर्सेस सेल्स रिपोर्ट; आयटम कॅटेगरी किंवा दिवसांनुसार सुद्धा इन्फिनिटीमध्ये उपलब्ध आहेत, ज्यावरून इन्व्हेंटरी किती वेळा रोटेट झाली किंवा इन्व्हेंटरी टर्न ओव्हर रेशो सहज समोर येतो.

ह्या तपशीलवार गोष्टी, इन्व्हेंटरीच्या चांगल्या आणि योग्य व्यवस्थापनासाठीसुद्धा महत्त्वाचा ठरतात.
अशारितीने, ॲक्मे इन्फिनिटीमधून, ज्वेलरी व्यवसायातील जटिल व्यवहारांची प्रॉफिटॅबिलिटी, फायदा किंवा तोटा, सहजपणे समजून येतो. ज्यामध्ये अकाउंटींग, इन्व्हेंटरी आणि ब्रँचेसचासुद्धा नीट विचार केलेला आहे.

सोने, चांदी, प्लॅटिनम असे मेटल (रॉ मटेरिअल), छोटे छोटे नाजूक तयार दागिने, कलर स्टोन्स, लूज डायमंड्स (वेगवेगळ्या व्हरायटी आणि किमतीचे), गिफ्ट आर्टिकल्स असा स्टॉक म्हणजे ‘आकार लहान पण किंमत महान!’ त्यामुळे सहाजिकच ज्वेलरी व्यवसायातील स्टॉक हा जोखमीचा विषय ठरतो आणि तो सांभाळताना सतर्कतेचे आव्हान आपोआपच तयार होते. परंतु, हे आव्हान पेलताना होणारा गोंधळ टाळायचा असेल तर पुढील चार गोष्टी करण्याची गरज आहे.

  1. स्टॉक ठेवायच्या प्रत्येक जागेचे कामकाज, स्वतंत्र विभाग म्हणून करणे.
  • विभागानुसार त्याला नाव, तशा व्यक्ती आणि तसे अधिकारही द्या.
  • स्टॉकच्या प्रत्येक जागी मुख्य म्हणून जबाबदार व्यक्तीची नेमणूक करा.
  • यामुळे प्रत्येक जागेवरील स्टॉकवर संबंधित जबाबदार व्यक्तीचे उत्तम नियंत्रण राहते.
  1. प्रत्येक आयटम आणि त्याच्या प्रत्येक छोट्यातल्या छोट्या पार्टला स्वतंत्र ओळख देणे.
  • सर्व आयटम्सना बारकोडिंग किंवा टॅगिंग करा.
  • बारकोड शक्य नसल्यास आयटम्सचा स्टॉक लॉट/बॅच/पॅकेट या स्वरुपात ठेवा.
  • यामुळे प्रत्येक आयटमची दुकानातील मुव्हमेंट चटकन ओळखता किंवा ट्रॅक करता येते.
  1. प्रत्येक स्टॉक किंवा त्याचा प्रकार, उचित आणि काटेकोर वर्क-फ्लोमधूनच हाताळणे.
  • वेगवेगळ्या स्टॉक प्रकारानुससार, तो हाताळण्याची स्वतंत्र कार्यपद्धती तयार करा.
  • सदर कार्यपद्धतीनेच संबंधित स्टॉक हाताळण्याची सवय लावा.
  • यामुळे एखादा स्टॉक कुठे आहे हे सतत कळत राहील आणि तो जबाबदार व्यक्तीकडेच राहील.
  1. स्टॉक दररोज, तसेच ठराविक कालांतराने वेगवेगळ्या पद्धतीने तपासत राहणे.
  • स्टॉक केवळ एकाच पद्धतीने न तपासता, संख्या, वजन, विभाग, व्यक्ती, यानुसारही स्टॉकची फेरतपासणी करत रहा.
  • दिवसातील ठराविक वेळ स्टॉक तपासण्यासाठी राखून ठेवा.
  • यामुळे स्टॉकची नोंद चटकन घेता येते आणि तो तितक्याच पटकन जुळवूनही होतो.

वरील चारही मुद्दे सहज आणि सोप्या पद्धतीने कार्यरत करण्यासाठी ॲक्मे इन्फिनीटीमध्ये वेगवेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण सोयी दिलेल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे काम करतात.

  1. स्टॉक ठेवायच्या प्रत्येक जागेचे कामकाज, स्वतंत्र विभाग म्हणून करण्यासाठी…
  • स्टॉकच्या प्रत्येक जागेचे स्वतंत्र विभाग, म्हणून स्वतंत्र लोकेशन सॉफ्टवेअरमध्ये तयार करता येते.
  • लोकेशन प्रमुखाला निरनिराळे व्यवहार ऑथोराईज्ड करण्याचे अधिकार देता येतात.
  • इन्फिनिटी, लोकेशननुसार स्टॉक रिपोर्ट दाखवत राहते.
  • लोकेशनच्या स्टॉकचे एसएमएस संबंधित जबाबदार व्यक्तीकडे जात राहतात.
  • यामुळे प्रत्येक छोट्या छोट्या विभागातील प्रत्येक छोट्या छोट्या स्टोअरेजवरती चांगले नियंत्रण राहते.
  1. प्रत्येक आयटम व त्याच्या प्रत्येक छोट्यातल्या छोट्या पार्टला स्वतंत्र ओळख देण्यासाठी…
  • इन्फिनिटी प्रत्येक आयटमला एक युनिक नंबर (लेबल नंबर) देते; जो बारकोड प्रिंट करून किंवा RFID द्वारे संबंधित आयटमला लावला जातो.
  • आयटमला, दागिन्यांना बारकोड लावणे शक्य नसल्यास त्यांच्या स्वतंत्र ओळखीसाठी पॅकेट्स, लॉट किंवा बॅच तयार करता येतात. आयटमच्या ॲट्रिब्यूटनुसार, किमतीनुसार पॅकेट्स तयार होतात.
  • मुख्यत्वे लुज आयटम्सचा स्टॉक हाताळण्यासाठी ही वैशिष्ट्यपूर्ण पॅकेट्स पद्धती खूप उपयोगी पडते. जसे लूज डायमंड्स, स्टोन्स इत्यादी. यामध्ये मटेरिअल एका पॅकेट मधून दुसर्‍या पॅकेटमध्ये देणे किंवा एखादे नवीन मटेरिअल, एखाद्या जुन्याच पॅकेटमध्ये क्लब करणे शक्य होते.
  • प्रत्येक नवीन एंट्रीचे नवीन पॅकेट तयार करता येते.
  1. प्रत्येक स्टॉक किंवा त्याचा प्रकार, उचित आणि काटेकोर वर्क-फ्लोमधूनच हाताळण्यासाठी…
  • प्रोक्युरमेंटमध्ये आलेल्या मालाकरिता इन्वर्ड मोड्यूल इन्फिनिटीमध्ये उपलब्ध आहे. प्रथम म्हणजे खरेदी बल्कमध्ये करता येते. आलेला माल बार कोडिंग होईपर्यंत लूज फॉर्ममध्ये असतो; जो लॉट-मॅनेजमेंटने हाताळला जातो. सदर माल टेस्टिंग आणि रिचेकिंगसाठी क्वॉलिटी चेकला पाठवता येतो. क्वॉलिटी चेकनंतर, योग्य मालाचे लेबलिंग होते. लेबलिंग झालेला माल हॉल मार्किंगला पाठवता येतो. अशाप्रकारे रिजेक्शन झालेले, क्वॉलिटी चेक ओके झालेले, त्यातून लेबलिंग झालेले मटेरिअल, असा ज्या-त्या लॉटचा प्रवास कुठल्याही क्षणी बघता येतो. यामुळे प्रत्येक विभागातील स्टॉकवर उत्तम नियंत्रण राहते. म्हणजे येथे केवळ आयटमनुसार रिपोर्टिंग न मिळता, लॉटनुसारही रिपोर्टिंग मिळते.
  • बार कोडिंग; प्रोक्युरमेंटच्या लॉटमध्ये झाल्यामुळे, खरेदी किंमत, पुरवठादाराची माहिती, ऑटोमॅटिक उपलब्ध होणे असे इतरही फायदे होतात.
  • जुन्या/मोडीच्या सोन्यासाठी रिफायनिंग मोड्यूल इन्फिनिटीमध्ये दिलेले आहे. यामध्ये घेतलेले सोने तीन पद्धतीने वर्गीकृत करता येते, जे पुढे ज्या त्या लोकेशनला पाठवता येते व तेथून ते मटेरियल पुढे मेल्टिंग, रिफायनिंग आणि लॅब सॅम्पल टेस्टिंग यांसाठी पाठवता येते.
  • काऊंटरवर एखादा दागिना डिसअसेंबल केल्यास डिसअसेंबल केलेला दागिना, त्याचा वेगळा भाग हे ऑटोमॅटिकली ठरवलेल्या पर्टिक्युलर लोकेशनला ट्रान्सफर होतात. जे तिथली संबंधित व्यक्ती ऑथोराईज करते.
  • ऑर्डरचा आयटमही सिलेक्ट केल्यावर, ऑर्डर कॉउंटरला (ऑर्डरच्या पेटीत) टो ट्रान्सफर होतो, ज्याचेही संबंधित व्यक्तीकडून ऑथोरायझेशन होते.
  1. स्टॉक दररोज तसेच ठराविक कालांतराने वेगवेगळ्या पद्धतीने तपासण्यासाठी…
  • दिवसाच्या शेवटी बार कोड स्कॅन करून किंवा RFID च्या साहाय्याने घेतलेला आयटमनुसार स्टॉक रिपोर्ट तंतोतंत टॅली करून घेता येतो. सदर स्टॉक कॉम्प्युटरला फीड करता येतो, ज्यावरून तो बरोबर आहे का? हे कॉम्पुटर टो चेक करतो. आणि त्यामुळे केवळ प्रिंटेड रिपोर्टवर अबवलंबून न राहता प्रत्येक काउंटरवर फिजिकल स्टॉक किती आहे हे सोप्या पद्धतीने समजते.
  • इन्फिनिटीमध्ये, दोन प्रकारे फिजिकल स्टॉक टेकिंग करायची सोय आहे! एक म्हणजे बारकोडनुसार दागिने अथवा आयटम स्कॅन करता येतात, ज्यासाठी पोर्टेबल डिव्हाइसमधून डायरेक्ट स्कॅन करून लेबल घेता येऊ शकतात. किंवा दुसरं म्हणजे वेईंग स्केलचा उपयोग करूनसुद्धा फिजिकल स्टॉक टेकिंग करता येते. ह्यामुळे एखादा जरी बार कोड अर्थात दागिना मिसिंग असेल तर तो चटकन निदर्शनास येतो.
  • फिजिकल स्टॉक टेकिंगचे शेड्युल तयार करून ठेवता येते. जेणेकरून योग्य वेळेला योग्य शेड्युलने फिजिकल स्टॉक टेकिंग घडत राहते आणि यामुळे ठराविक कालांतराने (शेड्युल्ड पद्धतीने) स्टॉक चेक होत राहतो, ज्यामुळे स्टॉक चेकिंगची काळजी करावी लागत नाही.

अशा पद्धतीने ॲक्मे इन्फिनिटीमधील निरनिराळ्या टूल्समुळे ज्वेलरी व्यवसायातील मौल्यवान स्टॉक कोणताही गोंधळ न होता, सतत टॅली राहतो. आणि त्यासाठी स्पेशल वेळही खर्च करावा लागत नाही!

खरेतर ज्वेलरी व्यवसायामध्ये असे होणे नैसर्गिक म्हणावे लागेल. कारण इतर व्यवसायांच्या तुलनेमध्ये ज्वेलरी व्यवसायात, ग्राहकाला सतत आणि अधिक सतर्कतेने सामोरे जाण्याची जास्त गरज असते. त्यामुळे, दैनंदिन धामधुमीमध्ये अकाउंटिंगला नियमित महत्त्व देणे सहजशक्य होत नाही. पण वेळच्या वेळी अकाउंटिंग पूर्ण करून तणावमुक्त रहाणे शक्य नाही असेही नाही. त्यासाठी पुढील गोष्टी कराव्या लागतील.

  1. व्यवहारांच्या नोंदी वेळच्या वेळी आणि अचूक करणे.
  • व्यवहारांची नोंद बारकाईने करा.
  • अकाउंटिंगला लागणाऱ्या सर्व गोष्टी व्यवहारांच्या नोंदणीमध्ये येत आहेत की नाही हे पहा.
  • अकाउंटिंग इफेक्ट व्यवस्थित सेट करून ठेवा. जसे जी. एस. टी. किंवा टी. डी. एस. चा हिशोब बिनचूक होणे इ.
  • अशाप्रकारे व्यवहाराची नोंद करतानाच योग्य काळजी घेतल्याने पुढील काम सोपे होते.
  1. व्यवहारांच्या नोंदींचे ऑटोमेशन करणे.
  • व्यवहारांची नोंद झाल्यावर त्यातील बारीकसारीक तपशील संबंधित खात्यामध्ये ऑटोमॅटिक पोस्ट (वर्गीकृत) करा. जसे की, बिल झाल्यानंतर जी.एस.टी. चा हिशोब होऊन तो जी.एस.टी. अकाउंटमध्ये आपोआप पोस्ट होणे. किंवा कारागिराला पेमेंट करताना त्याचा टी.डी.एस. स्वयंचलितपणे टी.डी.एस.च्या खात्यामध्ये वर्गीकृत होणे, इत्यादी.
  1. व्यवहाराच्या नोंदी योग्य पध्दतीने (ऑटोमॅटिकली) आणि त्वरित, अहवालात रूपांतरित करून घेणे.
  • सरकारला लागणारे अहवाल नियमित तयार करा (ऑटोमॅटिकली). जसे, नियमित लागणारे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाऊंट, बॅलेन्स शीट इत्यादी. किंवा मासिक जी.एस.टी.आर.1, थ्री बी सारखे रिपोर्ट्स अथवा टी.डी.एस. चा अहवाल.
  1. ऑडिटिंगसाठी उचित पध्दती तयार करणे.
  • ऑडिटिंगसाठी नोंदीचा तपशील तत्काळ समोर येईल अशी कार्यप्रणाली निवडा.

या सर्व गोष्टी सोप्या पद्धतीने कार्यान्वित करण्यासाठी ॲक्मे इन्फिनिटीमध्ये स्पेशल अकाउंटिंग आणि ऑडिटिंग मोड्यूल दिले आहे. यामध्ये अकाउंटिंग आणि गव्हर्नमेंट कम्प्लायन्ससाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी इनबिल्ट आहेत; ज्या पुढीलप्रमाणे काम करतात.

  1. व्यवहारांच्या अचूक नोंदींसाठी…
  • टी.डी.एस. किंवा जी.एस.टी. चा हिशेब त्वरित आणि ऑटो होतो.
  • व्यवहारांची नोंद करताना ग्राहक, व्हेंडर किंवा आवश्यक तिथे पॅन नंबर ऑटोमेटेड पद्धतीने घेतला जातो.
  • ठराविक व्यवहारांच्या नोंदींसाठी योग्य ती लॉक्स टाकलेली असतात, ज्यामुळे नोंद करताना चुका टाळल्या जातात, जसे की रोख रक्कम देण्या-घेण्याची मर्यादा इत्यादि.
  1. व्यवहारांच्या नोंदींच्या ऑटोमेशनसाठी…
  • सेल बिल किंवा कोणत्याही प्रकारचा व्यवहार झाला तर त्याचा अकाउंटिंग इफेक्ट ऑटो पोस्ट होतो.
  • कोणताही व्यवहार केल्यावर त्याला लागणाऱ्या जी.एस.टी. किंवा टी.डी.एस.च्या नोंदी संबंधित खात्यामध्ये ऑटो पोस्ट होतात ज्यामुळे लागणारी सर्व लेजर्स नेहमीच अप-टू-डेट असतात.
  1. व्यवहाराच्या नोंदी त्वरित अहवालात रूपांतरित होण्यासाठी…
  • अकाउंटिंगचे किंवा सरकारला सादर करण्याचे सर्व अहवाल ऑटोमॅटिक तयार होतात. यामुळे सरकारी नियमांचे पालन करणे सहजसोपे होते. जसे, महिन्याच्या शेवटी लागणारा टी.डी.एस. रिपोर्ट किंवा दर महिन्याला लागणारा थ्री बी किंवा जी.एस.टी.आर.1 रिपोर्ट इत्यादि.
  • जी.एस.टी. अहवाल जी.एस.टी. फॉरमॅटमध्ये ऑटो तयार होतो. त्याची जेसॉल एक्सेल फाईलही तयार होते जी कुणाच्याही मदतीशिवाय, अत्यंत सुरळीत पद्धतीने थेट जी.एस.टी. पोर्टलवर अपलोड करता येते.
  • बॅलेन्स शीट, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस, डे-बुक्स ऑटोमॅटिक तयार होतात.
  • दिलेल्या व्हॅल्युएशन मेथडप्रमाणे ट्रेडिंग अकाउंटमध्ये ग्रॉस प्रॉफिट ऑटो तयार होतो. यावरूनच दररोज होणाऱ्या नोंदींमधून नेट प्रॉफिट ऑटो कळत राहतो.
  • ऑटोमेटेड फायनान्शिअल इयर एन्ड करता येते.
  • बँक रिकन्सीलिएशन अहवाल तयार करण्याची सोय इन्फिनिटी मध्ये उपलब्ध आहे. यात बँकेचे स्टेटमेंट इम्पोर्ट करून, ही प्रोसेस ऑटोमेटेड करणेही शक्य होते.
  1. ऑडिटिंगची उचित पध्दती तयार करण्यासाठी…
  • इन्फिनिटी मध्ये प्रत्येक व्यवहार तपासता येतो आणि त्याचा लॉगही पाहता येतो.
  • ठराविक तारखेपर्यंतचे ऑडिट पूर्ण झाल्यानंतर संबंधित नोंदी लॉक करता येतात (लॉक डेट फॅसिलिटी), जेणेकरुन त्या नोंदी कोणीही बदलू शकत नाही आणि कामकाजाच्या नोंदी सुरक्षित राहतात.
  • अकाउंटिंगचा डाटा टॅलीमध्ये एक्स्पोर्ट होतो.
  • व्यवहारांच्या ऑडिटसाठी स्वतंत्र ऑडिटिंग मोड्यूल इन्फिनिटी मध्ये उपलब्ध आहे.

याशिवाय महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲक्मे इन्फिनिटी मध्ये व्यवसायोपयोगी छोट्या छोट्या ऑटोमेटेड सोयी दिल्या आहेत. जसे, आज भरायची चेकची लिस्ट स्वचलितपणे तयार होते, इत्यादी.
अशा पद्धतीने ॲक्मे इन्फिनिटी व्यवहाराच्या अगदी बारीकसारीक नोंदी अचूक ठेवते, व्यवहारांच्या नोंदींचे ऑटोमेशन करून लागणारे सर्व अहवाल त्वरित तयार करते. ऑडिटिंगसाठी खास पद्धती प्रदान करून टाइमचे प्रेशर कमी करते आणि अकाउंटिंग व ऑडिटिंग कायद्याला अनुसरून, योग्य वेळेत पूर्ण करते. शेवटी तुम्ही तणावमुक्त राहणे… जास्त महत्वाचे!

ज्वेलरी व्यवसायातील विक्रीचा एक मोठा हिस्सा; ‘जुन्या सोन्याच्या बदल्यात नवे दागिने देणे’ या एक्स्चेंज सेलवर अवलंबून असतो. अशा जुन्या सोन्याच्या व्यवहारात; त्याच्या फायद्यापर्यंत पोहचण्यासाठी पुढील चार गोष्टी करणे आवश्यक आहे.

  1. जुने सोने, जुने दागिने योग्य किमतीने खरेदी करणे.
  • जुने सोने खरेदी करण्याची उचित पद्धत तयार करा.
  • जुने सोने कटाक्षाने; ठरलेल्या पद्धतीप्रमाणेच खरेदी करा.
  1. खरेदी केलेल्या जुन्या सोन्यामधून अधिक फायदा करून घेणे.
  • जुन्या सोन्याचे वर्गीकरण करा. जसे शुद्ध सोने किंवा वेढणे, परत वापरता येण्याजोगे दागिने आणि मेल्टिंगसाठीचे सोने, इत्यादि.
  • शुद्ध सोने थेट बुलियन (वळे किंवा बिस्किट) म्हणून विक्रीस उपलब्ध करा.
  • परत वापरता येण्याजोगे दागिने थोड्या पॉलिशिंग आणि डागडुजीनंतर थेट नवे दागिने म्हणून विक्रीस ठेवा आणि फायदा वाढवा.
  • उरलेले; थेट विक्री न करता येण्याजोगे; जुने सोनेच मेल्टिंगसाठी पाठवा.
  1. मेल्टिंगसाठीच्या सोन्यामधील फायदा-तोटा तपासून घेणे.
  • मेल्टिंगसाठीचे सोने उचित पद्धतीनेच मेल्टिंग आणि रिफायनिंग करून घ्या.
  • मेल्टिंगनंतर त्याची शुद्धता; आपण ठरवलेल्या शुद्धतेशी आणि दिलेल्या किमतीशी जुळवून पहा.
  1. जुन्या सोन्यातील फायदा अकाउंटिंगमध्येही अचूक समोर येणे.
  • जुन्या सोन्याचे अकाउंटिंग व्यवस्थित करा.
  • जुन्या सोन्यातील फायदा ट्रेडिंग अकाउंटमध्ये परावर्तित होण्यासाठी योग्य पद्धती तयार करा.

वरील सर्व कामे सहज आणि अचूक होण्यासाठी ॲक्मे इन्फिनिटीमध्ये खास सुविधा आणि रिफायनरी मोड्यूल दिलेले आहे जे पुढील प्रमाणे काम करतात.

  1. जुने सोने, जुने दागिने योग्य किमतीने खरेदी करण्यासाठी….
  • पॉलिसीप्रमाणे; विक्रीच्या दरावर अवलंबून असलेला, जुन्या सोन्याच्या खरेदीचा दर फॉर्म्युलाद्वारे सॉफ्टवेअरमध्ये सेट करून ठेवता येतो.
  • यामध्ये; सोने केवळ खरेदी करणार असू तर वेगळा दर आणि एक्स्चेंज करणार असू (जुने सोने घेऊन नवीन दागिने देणार असू) तर वेगळा दर असे सेट करता येते.
  • खरेदी केले जाणारे जुने सोने, स्वत:च्या दुकानातून विकलेले आहे का दुसऱ्या दुकानातून विकले आहे असे वर्गीकरण करून, त्यानुसार त्याच्या एस्टीमेटेड फाईन वेटचा हिशेब करता येतो.
  • स्वत:च्या दुकानातून विकल्या गेलेल्या सोन्यासाठी कॅरेटनुसार योग्य पद्धतीने दर घेण्याची आणि दुसऱ्या दुकानातून विकल्या गेलेल्या सोन्यासाठी, त्याची शुद्धता तपासून त्यानुसार दर लावण्याची (त्याचे एस्टीमेटेड फाईन वेट घेण्याची) सोय इन्फिनिटीमध्ये दिलेली आहे. आता गोल्ड टेस्टिंगमुळे यामध्ये अधिक अचूकता आणणे सोपे झाले आहे.
  • अशा वैशिष्ट्यांमुळे जुने सोने योग्य किमतीने खरेदी करून नुकसान टाळता येते.
  1. खरेदी केलेल्या जुन्या सोन्यामधून अधिक फायदा करून घेण्यासाठी…
  • सॉफ्टवेअरमध्ये दिवसाच्या शेवटी दिवसभरातील जुन्या सोन्याची स्वतंत्र बॅच तयार करता येते.
  • या बॅचमधून बुलियन (कॉईन्स) आणि जे दागिने पॉलिश करून वापरणे शक्य आहेत असे दागिने, सहज वेगवेगळे करता येतात.
  • पुढे उरलेले सोने आपोआप मेल्टिंग प्रोसेससाठी पाठवले जाते.
  • असे वर्गीकरण केल्यामुळे जुन्या सोन्याच्या व्यवहारामध्ये नफा वाढण्यास मदत होते.
  1. मेल्टिंगसाठीच्या सोन्यामधील फायदा-तोटा तपासून घेण्यासाठी…
  • मेल्टिंगला दिलेले सोने परत आल्यावर, त्यातील एक तुकडा लॅब सॅम्पल म्हणून बाजूला काढून, लॅबमध्ये त्याची शुद्धता स्वतंत्रपणे तपासता येते.
  • लॅब सॅम्पल काढून उरलेले सोने मेटल बॉल रिफायनिंगसाठी पाठवून त्याचे फाईन वेट काढता येते.
  • आता गिऱ्हाईकाला दिलेल्या पैशाच्या मोबदल्यात मिळालेले जुने सोने, लॅब रिपोर्ट आणि शेवटी राहिलेले फाईन गोल्ड, यामध्ये किती नफा किंवा तोटा झाला हे बॅच (लॉट) तयार केल्यामुळे अचूक आणि सहज समजते.
  • ह्या बॅचेस ब्रँचनुसारही करता येतात. ज्यामुळे जुन्या सोन्यातील नफा ब्रँचनुसारही कळू शकतो.
  • ह्या बॅचेस डेटनुसारही तयार करता येतात.
  1. जुन्या सोन्यातील फायदा अकाउंटिंगमध्येही अचूक समोर येण्यासाठी…
  • जुन्या सोन्याचे स्वतंत्र ट्रेडिंग अकाउंट सॉफ्टवेअरमध्ये तयार करता येते.
  • कारागिराला देऊन फाईन आल्यानतंर, जुने सोने जेव्हा 22 कॅरेट, स्टँडर्ड बार किंवा कॉइनला रूपांतरित होते आणि नवीन ऑर्नामेंटला कन्व्हर्ट केलेल्या जुन्या सोन्याचे मूल्यांकन, आपोआप URD वेटेड ॲव्हरेजवरून होते.
  • यामुळे ट्रेडिंग अकाउंटमध्ये आपल्याला जुन्या सोन्याच्या व्यवहारातील नफा कळत राहतो.

अशा पद्धतीने, ॲक्मे इन्फिनिटी सॉफ्टवेअरमधून, जुन्या सोन्याची योग्य किंमत मिळवता येते, त्याचे वर्गीकरण करून त्यात नफा वाढवता येतो, मेल्टिंगनंतर त्यातील फायदा-तोटा अचूक तपासता येतो आणि महत्त्वाचे म्हणजे जुन्या सोन्याच्या व्यवहारातील नफा स्वतंत्र ट्रेडिंग अकाऊंटमध्ये पाहता येतो. आणि त्यामुळेच जुन्या सोन्याच्या व्यवहारात मालकाला अडकून रहावे लागत नाही. म्हणतात ना.. जुने ते सोने, अर्थात जुने ते फायद्याचे!

ऑर्डरच्या दागिन्यांचा फॉलोअप वेळच्यावेळी करून ग्राहकाला ठरलेल्या वेळेत, ठरलेल्या दर्जाचे आणि ठरलेल्या बजेटमध्ये किंवा त्याच्या आसपासच्या बजेटमध्ये दागिने देणे फार महत्त्व्याचे आहे. कारण त्यामुळे ग्राहकाचा आपल्यावरचा विश्वास दृढ होण्यास मदत होते. त्यासाठी खालील गोष्टी करणे मात्र गरजेचे आहे.

  1. ऑर्डर योग्य पद्धतीने घेणे.
  • ऑर्डर घेतानाच ऑर्डरचे सर्व पॅरामिटर्स व्यवस्थित नोंद करून घ्या.
  1. ग्राहकाकडून ऑर्डर घेतल्यापासून ती ग्राहकाला देण्यापर्यंतची कामाची संपूर्ण साखळी कार्यक्षम करणे.
  • ऑर्डरिंगच्या कामासाठी पद्धतशीर कार्यपद्धतीचा अवलंब करा.
  1. ऑर्डरचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी अलर्ट रिमाईंडर पद्धत रुजवा.
  • ऑर्डरचे दागिने वेळेत मिळण्यासाठी कारागिराला वेळोवेळी रिमांइड करा.
  • ऑर्डरचे दागिने वेळेत घेऊन जाण्यासाठी ग्राहकालाही रिमाईंडर द्या.
  1. कस्टमरच्या रिपेअर ऑर्डरची कामेदेखील वेळेत पूर्ण करा.
  • रिपेअर ऑर्डरसाठीसुद्धा कार्यक्षम पद्धती तयार करा.

यामुळे एकंदरीतच ग्राहक त्याच्या ऑर्डरविषयी समाधानी आणि आनंदी राहतो. वरील सर्व कामे ऑटोमेट करण्यासाठी ॲक्मे इन्फिनिटीमध्ये कस्टमर ऑर्डर प्रोसेसिंग हे खास मोडयूल दिलेले आहे जे पुढीलप्रमाणे काम करते.

  1. ऑर्डर योग्य पद्धतीने घेण्यासाठी…
  • ऑर्डर घेताना अत्यंत छोट्या छोट्या गोष्टींचा तपशील सॉफ्टवेअरमध्ये टाकता येतो.
  • ऑर्डर; शॉप सॅम्पल आहे की कस्टमर सॅम्पल? की ऑर्डर म्हणून दुकानातीलच एखादा आयटम निवडलेला आहे? की एखाद्या वर्णनावरुन ऑर्डर बनणार आहे? हे स्पष्ट नमूद करून ठेवता येते.
  • ऑर्डरच्या माहितीसोबत एखादी इमेज किंवा फोटो ॲटॅच करता येतो.
  • ऑर्डरसाठी कस्टमर सॅम्पल किंवा कस्टमर स्टोन्स असतील तर त्याची इत्थंभूत नोंद ठेवते.
  1. ग्राहकाकडून ऑर्डर घेतल्यापासून ती ग्राहकाला देण्यापर्यंतची कामाची संपूर्ण साखळी कार्यक्षम करण्यासाठी…
  • एक दुकान किंवा एकाहून अधिक शाखा या दोहोंसाठी प्रॉपर ऑर्डर फ्लो उपलब्ध आहे.
  • ऑर्डर जर सिलेक्टेड आयटम असेल तर तो आयटम लगेचच ऑर्डर पेटीमध्ये ट्रान्स्फर करता येतो. ऑर्डर सिलेक्टेड नसेल तर हेड ऑफिसला, वेगवेगळ्या ब्रँचेस किंवा वेगवेगळ्या काउंटरवरच्या ऑर्डर्स, कारागिराला देण्यासाठी डिस्प्ले होत राहतात.
  • घेतलेल्या ऑर्डर्स हातोहात नेहमीच्या ठराविक कारागिराला किंवा ऑर्डरनुसार योग्य कारागिराला सुपूर्द करता येतात.
  • दिवसाच्या शेवटी ज्या त्या कारागिरांना त्यांच्या त्यांच्या ऑर्डर्स; स्लिप प्रिंट करून अथवा मेलने कळवता येतात. यामध्ये काउंटरवर घेतलेल्या ऑर्डरच्या सर्व तपशीलांबरोबर कारागिराला कळवायच्या अतिरिक्त गोष्टीही समाविष्ट असतात.
  • कारागिराकडून ऑर्डरचे मटेरिअल आल्यानंतर त्याची योग्य पद्धतीने नोंद करता येते. उदा. ऑर्डरपेक्षा जर वजन वाढले असेल तर वाढलेले वजन स्वतंत्रपणे टाकता येते, इत्यादी.
  • तपासलेला ऑर्डरचा दागिना बार कोडिंग करून ज्या त्या ब्रँचला किंवा काउंटरला अचूक पोहचवला जातो.
  • ऑर्डरमध्ये शॉप सॅम्पल किंवा कस्टमर सॅम्पल असेल तर ऑर्डर कारागिराला देताना त्याचा रिमाईंडर मिळतो.
  • पुढे काउंटरवरून ऑर्डर ग्राहकाला दिल्यानंतर तिचे अचूक बिल तयार होते.
  • ऑर्डरच्या कामाची ही संपूर्ण साखळी; सर्व बारीकसारीक गोष्टी ध्यानात घेऊन तयार केलेली आहे.
  1. ऑर्डरचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी…
  • इन्फिनिटी; प्रत्येक लेव्हलला होणाऱ्या बारीकसारीक व्यवहारांवर लक्ष ठेवते व त्याचा अलर्ट प्रत्येक संबधित व्यक्तीला देत राहते.
  • संबधित व्यक्तींना; काम योग्य वेळेत पूर्ण करण्यासाठी सॉफ्टवेअर सातत्याने रिमाईंडर्स देत राहते.
  • ऑर्डर घेतल्या बरोबर हेड ऑफिसच्या माणसाला कोठे कोठे, काय काय ऑर्डर घेतली आहे हे ऑटो कळत राहते.
  • ऑर्डर कारागिराला दिल्यानंतर, त्याला त्या दिवशी ज्या ऑर्डर्स द्यायच्या आहेत त्याचा रिमाईंडरचा एस.एम.एस. आदल्या दिवशीच पाठवता येतो. आणि तसा अहवाल दररोज सकाळी हेड ऑफिसच्या ऑर्डर व्यवस्थापकाला मिळत राहतो.
  • ग्राहकाला ऑर्डर तयार असण्याचा एस.एम.एस. पाठवता येतो. शिवाय वेबसाइटवरून किंवा ॲपमधूनही ग्राहकाला ऑर्डर स्टेट्स कळत राहतो.
  • ऑर्डर तयार होऊनसुद्धा ग्राहकाने ती लगेच नेली नाही तर त्याचाही नियमित फॉलोअप ग्राहकाशी करता येतो. अशा पद्धतीने ऑर्डरचा सतत फॉलोअप करत राहिल्यामुळे कस्टमरला ती योग्य वेळेत देता येते.
  1. कस्टमरच्या रिपेअर ऑर्डरची कामेदेखील वेळेत पूर्ण करण्यासाठी…
  • ग्राहकाने रिपेअरसाठी दिलेला आयटमसुद्धा एक प्रकारची मेक टू ऑर्डरच असते. त्याच्यासाठी रिपेअरचा उचित प्रोसेस फ्लो इन्फिनिटीमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये ग्राहकाकडून आलेला आयटम कारागिराला देणे, त्याची दुरुस्ती किंवा बदल करणे, वजन वाढवणे, स्टोन्स वाढवणे, काम झाल्यावर तो परत ग्राहकाला देणे, अशी सर्व छोटी मोठी कामे तपशीलवार समाविष्ट आहेत.
  • रिपेअर ऑर्डरचेसुद्धा रिमाईंडर आणि अलर्ट सातत्याने मिळत राहतात.
  • रिपेअर ऑर्डर ग्राहकाला दिल्यानंतर तिचे अचूक बिल तयार होते. उदा. जर वजन वाढून आले असेल तर त्याची स्वतंत्रपणे नोंद होऊन वाढलेल्या वजनाचे बिलिंग ग्राहकाला योग्य प्रकारे करता येते.

अशा पद्धतीने ग्राहकाला ठरलेल्या वेळेत, ठरलेल्या दर्जाचे दागिने योग्य किमतीला देण्यासाठी फॉलोअप मेकॅनिझम आणि त्याचबरोबर रिपेअरिंगची कार्यक्षम प्रणाली ॲक्मे इन्फिनिटीमध्ये दिली असल्यामुळे, ग्राहकांचा आपल्या सर्व्हिसबाबत विश्वास अधिक दृढ होतो.

हो! टाळता येते!! खरंतर, ज्वेलरी व्यवसायात दिवसाच्या शेवटी करायच्या कामांची संख्या इतर व्यवसायांच्या तुलनेने जास्त असते. जसे, दररोजचा प्रत्येक काउंटरचा, ऑर्डर पेटीचा, डिसअसेंबल झालेल्या छोट्या छोट्या आयटम्सचा आणि ओल्ड गोल्डचा स्टॉक जुळवणे; शिवाय दररोजची कॅश, आलेले चेक्स, क्रेडिट कार्डच्या मशीनवरचे रिपोर्ट जुळवणे इत्यादी. ही सर्व कामे वेगवेगळ्या काउंटरवर करण्याची असल्यामुळे आणि दिवसातला प्रत्येक व्यवहार अन व्यवहार तपासायचा असल्याने, दुकान बंद करायला वेळ होतोच. शिवाय, या प्रत्येक कामामध्ये थोडा थोडा जरी वेळ जास्त लागला तरी एकूणच वेळ जास्त लागतो. त्यामुळे दुकान बंद करतानाचा हा वेळ जर वाचवायचा असेल तर पुढील गोष्टी करणे गरजेचे आहे.

  1. कॅशिअरची कॅश जुळवण्यासाठी एखादी सुव्यवस्थित कार्यपद्धती तयार करणे.
  • ज्या ज्या वेळी कॅशिअर कॅश देतो किंवा घेतो तेव्हा तेव्हा त्याची अचूक नोंद करा.
  • प्रत्येक कॅशिअरच्या रोख व्यवहाराची नोंद केल्यावर लगेचच त्याच्या पुढे त्यांचा बॅलन्स लिहून ठेवा.
  • असे केल्यामुळे ज्या त्या कॅशिअरची कॅश चटकन कळून येते शिवाय कॅशचे कामही सोपे होते.
  1. प्रत्येक काउंटरवरचा सेल्सचा स्टॉक चटकन कळण्यासाठी एखादी मेथड सेट करणे.
  • प्रत्येक विक्री झाल्यानंतर ज्या त्या विक्रीच्या नोंदीबरोबर आयटमचा बॅलन्स लिहून ठेवा.
  • दिवसाच्या शेवटी सर्व आयटम मोजून तो स्टॉक रिपोर्टशी टॅली करा.
  1. डे एंड योग्य पद्धतीने करायची सुरळीत प्रोसेस कार्यान्वित करणे.
  • दिवसाच्या सुरुवातीला कॅशियरकडे ठरवून दिलेली रक्कमच ठेवा.
  • दिवसाच्या शेवटी, एकेका विभागाचे काम पूर्ण करत जा.
  1. व्यवहार होतेवेळी घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या त्या वेळी तपासणे.
  • व्यवहारांमधील स्टॉक आणि कॅश मुव्हमेन्टचा त्या त्या वेळेला ट्रॅक ठेवा.
  • ग्राहकाला दिले जाणारे डिस्काउंट किंवा जुन्या सोन्याची प्युरिटी, नोंद करते वेळीच तपासून घ्या.

ॲक्मे इन्फिनिटीमध्ये ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी सोईस्कर पद्धती दिलेल्या आहेत ज्या पुढीलप्रमाणे काम करतात.

  1. कॅशिअरची कॅश जुळवणारी एखादी सुव्यवस्थित कार्यपद्धती तयार करण्यासाठी…
  • ॲक्मे इन्फिनिटीमध्ये कॅशिअर मोड्यूल आहे, ज्यामध्ये झालेला प्रत्येक व्यवहार कॅशिअरला ऑथोराईज किंवा पास करता येतो.
  • ज्या वेळेला कॅशिअर पैसे देतो किंवा घेतो त्या वेळेला संबंधित व्यवहार पास करून त्या व्यवहाराची नोंद कॅशिअर काही सेकंदातच करू शकतो, ज्यामुळे कॅश टॅली करण्याचे काम सुरळीत होते.
  • कॅशिअरचे सर्व कामकाज कॅशिअरनुसार करायची सोय आहे. त्यामुळे उपलब्ध कॅशिअर्सपैकी कोणालाही लवकर जायचे असेल तरी सुद्धा त्याची कॅश तशी टॅली करून त्यांना मोकळे करता येते.
  1. प्रत्येक काउंटरवरचा सेल्सचा स्टॉक चटकन कळण्यासाठी…
  • आयटमनुसार स्टॉक समरी रिपोर्टमध्ये, प्रत्येक आयटमच्या बाबतीत संबंधित आयटमचे ओपनिंग, त्या दिवशी काउंटरवर आलेले आयटम, त्यातून विक्री झालेले आयटम आणि क्लोजिंग लगेचच कळते.
  • आयटमनुसार स्टॉक समरी रिपोर्ट हा कॅटॅगिरीनुसारही मिळतो.
  • स्टॉक चेकिंग करताना आयटम मर्जिंगही करता येते. उदा. जर दुकानामध्ये 22 कॅरेट आणि 23 कॅरेट अशा दोन्ही कॅरेटच्या बांगड्या असतील तर त्यांची कन्सॉलिडेटेड, अर्थात एकत्रित संख्या मिळू शकते.
  • सेटच्या आयटमचा स्टॉक, एमआरपी आयटमचा स्टॉक (विथ व्हॅल्यू) स्वतंत्र मिळतो. स्टॉक रिपोर्ट लोकेशननुसार सुद्धा मिळतात. यामध्ये संबंधित लोकेशनवर ड्रिल डाउन करून व्यवहाराच्या लेव्हलपर्यंत जाता येते. एखाद्या आयटमचा विशिष्ट लोकेशनचा स्टॉक लेबलनुसारही मिळतो.
  • सेल्समन त्याच्या काउंटरवरचा स्टॉक मोजून ती संख्या कॉम्प्युटरला फीड करतो आणि कॉम्प्युटर ऑटोमॅटिकली ती पडताळून (टॅली करून) घेतो. मग सेल्समन स्वतःला लॉक करतो.
  • या सर्व गोष्टींमुळे सेल्समनला डे एंडला काउंटरवरती स्टॉक कमी वेळात टॅली करणे सहज शक्य होते.
  1. डे बिगिन आणि डे एंड योग्य पद्धतीने करणारी सुरळीत प्रोसेस कार्यान्वित करण्यासाठी…
  • डे एंड मोडयूलमध्ये दिवसाच्या सुरुवातीला कॅशिअरकडे कॅश देता येते आणि दिवसाचा रेट सेट करता येतो. त्यानंतर संबंधित दिवसासाठी, सॉफ्टवेअरमध्ये डे बिगिन होतो.
  • यानंतर होणारे सर्व व्यवहार कॅशिअरला पासिंगला जात असतात. आणि कॅशिअरने पास केल्यावर संबंधित कॅशिअरची शिल्लक कमी जास्त होत असते. सर्व व्यवहारांचे इन्व्हेंट्री इफेक्टसुद्धा ऑटोमॅटिक पडत असतात.
  • प्रत्येक काउंटरचा किंवा लोकेशनचा आयटमनुसार, पॅकेटनुसार, लेबलनुसार स्टॉक रिपोर्ट ऑटोमॅटिक मिळतो.
  • डे एन्डला व्यवहारांच्या नोंदी व्यवस्थित झालेल्या आहेत ना? याची खात्री करून घेतल्यावरच सेल्समन त्याचा क्लोजिंग स्टॉक भरतो आणि पहिल्यांदा सेल्समन लॉक केला जातो. याचप्रमाणे कॅशिअरलाही त्याचा कॅश बॅलन्स टाकून लॉक केले जाते. अशा तऱ्हेने ब्रँच पद्धतशीरपणे बंद (क्लोज) होते.
  • हे सर्व कामकाज ऑथोरियझेशन/ऑडिटिंग मेथड्सने होत असते ज्यामुळे छोट्या छोट्या चुका टाळल्या जातात. दिवसभरामध्ये घडलेल्या छोट्या छोट्या व्यवहारांचे पासिंग डे एन्डला करता येते.
  • या सर्व सुविधांमुळे डे एन्डची प्रोसेस सुरळीत, सुटसुटीत तर होतेच शिवाय कमी वेळात पूर्ण होते.
  1. व्यवहार होतेवेळी घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या त्या वेळी तपासण्यासाठी…
  • कुठलाही व्यवहार झाल्यानंतर लगेचच त्याचे पासिंग करता येते. उदा. दिवसभरात काउंटरवरती, डिस्काऊंट दिलेली सर्व बिले दिवसाच्या शेवटी चेक करण्याऐवजी, काउंटरवर डिस्काऊंट दिल्या दिल्या तो पासिंगला येतो. आणि जोपर्यंत ओनर किंवा मॅनेजर ते पास करत नाही तोपर्यंत त्या बिलाची प्रिंट निघत नाही.
  • हे डिस्काऊंट ओनर मोबाईल ॲपमध्येसुद्धा पासिंगला उपलब्ध असतात. त्यामुळे दुकान मालक नेहमी दुकानात उपलब्ध असणे गरजेचे नसते.
  • अशा पद्धतीमुळे, व्यवहार करतानाच त्या व्यवहाराची सत्यता किंवा सदर व्यवहार व्यवस्थित केला आहे की नाही हे तपासले जात असल्यामुळे दिवसाच्या शेवटीचे एकदम करायचे काम कमी होऊन वेळ वाचतो.

अशा पद्धतीने कॅशियर मोड्यूल, सेल्समन लॉकिंग, सेल्समनचे स्टॉक टेकिंग त्याचप्रमाणे सुटसुटीत डे एंड प्रोसेस आणि सतत ऑथोरायजेशन किंवा पासिंगची सोय या सुविधांमुळे ॲक्मे इन्फिनिटीमध्ये दिवसाच्या शेवटी कमीत कमी वेळात कॅश, ओल्ड गोल्ड, ऑर्डरचा स्टॉक काउंटरवरचा स्टॉक, डिसअसेंबल झालेल्या छोट्या छोट्या आयटमची डिलिव्हरी, दिलेले चेक्स, दिलेले क्रेडिट्स डिस्काउंट्स आणि त्याच बरोबर क्रेडिट कार्ड्स, या सर्वांचा अचूक हिशोब लावून लवकरात लवकर घरी जाणे शक्य होते.
शेवटी… घरी लवकर पोहचणे महत्त्वाचे!

नक्कीच आहेत!! परंतु यासाठी दुकानातल्या कामकाजांच्या पिढीजात पद्धतींमध्ये बदल करणे ही पहिली पायरी ठरते. त्यानंतर पुढील पद्धती अमलात आणून ग्राहकांची गर्दी सुरळीतपणे हाताळता येते.

  1. नवीन काऊंटर्स तयार करणे.
  • कामाप्रमाणे जास्तीत जास्त काऊंटर्स तयार करा.
  • सणाच्या दिवशीसुद्धा केवळ त्या दिवसापुरते नवीन काऊंटर्स तयार करा. जसे, सेव्हिंग स्कीमसाठी वेगळा काऊंटर, स्टॅन्डर्ड बार, कॉईन्स आणि वेढण्यासाठी वेगळा काऊंटर इत्यादी.
  • असे नवीन काऊंटर्स तयार केल्याने जी ती गर्दी ज्या त्या काऊंटर वर जाते आणि विभाजित होते. त्यामुळे ग्राहकांना त्यांचे काम पटकन करून चटकन मोकळे होता येते.
  1. थोडे थोडे काम प्रत्येकाने वेगाने करणे.
  • कामांची विभागणी करून जी ती कामे संबंधित व्यक्तींकडे सुपूर्द करा.
  • हातातले काम चटकन संपवा आणि पुढच्या पूर्ततेसाठी ते दुसर्‍याकडे तत्काळ देऊन टाका.
  • अशा रितीने एका माणसाला लागणारा वेळ कमी होऊन ग्राहकाला चटकन मोकळे करता येते.
  1. सेल्स-काऊंटरवरती सेल्समनचा वेळ वाचेल अशा उपाययोजना करणे. यामुळे प्रामुख्याने गर्दीच्या वेळी एकत्रित भरपूर वेळ वाचू शकतो.
  1. डिलिव्हरी आणि बिलिंग काऊंटरवर ग्राहकाला लवकर मोकळे करण्याची सोय करणे.
  • खरेतर ग्राहकाला चटकन पैसे देऊन जाण्याची घाई असते आणि असे केल्याने तो बिलिंग काऊंटरवर लवकर मोकळा होऊन अधिक खुष होत असतो.

आता हीच चार कामे दुकानात अगदी सहज कार्यान्वित करण्यासाठी अ‍ॅक्मे इन्फिनिटीमध्ये भरपूर फीचर्स उपलब्ध आहेत.

  1. नवीन काऊंटर्स तयार करण्यासाठी…
  • खूप सोपी प्रोसेस आहे. यामधून सॉफ्टवेअरमध्ये केव्हाही नवीन लोकेशन तयार करता येते. संबंधित लोकेशनला; केवळ आवश्यक तेच डॉक्युमेंट उपलब्ध करून देता येतात, ज्यामुळे कामे वेगाने होतात.
  • अशा लोकेशनचे सर्व कामकाज स्वतंत्रपणे करता येते. सदर कामकाज ऑफलाईन मोडमध्ये (कॉम्प्युटर मेन सिस्टीमला न जोडता) करणेसुद्धा शक्य आहे.
  • फास्ट बिलिंगच्या एका वैशिष्ट्यपूर्ण पर्यायामुळे ठराविक आयटम जलद (वेगाने) विकता येतात. उदा. वेढणे. असे काऊंटर हे ऑफलाईन अर्थात दुकानाच्या बाहेरसुद्धा तयार करता येते.
  • अशा तऱ्हेने स्वतंत्र काऊंटर्स केल्यामुळे गर्दीचा मोठा भाग ज्या त्या काऊंटरकडे वळतो ज्यामुळे गर्दीच्या वेळीही उत्तम नियंत्रण मिळवता येते.
  1. थोडे थोडे काम प्रत्येकाने वेगाने करण्यासाठी…
  • कामे छोटया-छोटया भागामध्ये विभागून ती चटकन पूर्ण करण्यासाठी काऊंटर मॅनेजमेंटची सिस्टीम सॉफ्टवेअरमध्ये दिलेली आहे. उदा. डिलिव्हरी काऊंटरवर दागिने पसंद पडल्यावर सेल्समन केवळ डिलिव्हरी स्लीप/नोट तयार करतो. ती डिलिव्हरी स्लीप बिलिंग काऊंटरला येते. बिलिंग काऊंटरवरती फक्त बिल तयार केले जाते. तेही जलद होते कारण डिलिव्हरी स्लीपमधून सगळ्या आयटमचे फीडिंग आधीच झालेले असते. जेव्हा ग्राहक पेमेंटसाठी कॅशिअर काऊंटरला येतो तेव्हा कॅशिअर केवळ बिलावरील बार कोड स्कॅन करून पेमेंटचे कामकाज पूर्ण करतो. अशा पद्धतीने कामाची विभागणी करून काम चटकन संपवता येते.
  • काऊंटर मॅनेजमेंटमधून ओल्ड गोल्ड आणि ऑर्डरसाठीही स्वतंत्र काऊंटर्स तयार करता येतात.
  • काऊंटर मॅनेजमेंटमुळे दुकानातील कामाचा फ्लो व्यवस्थित राहतो. याशिवाय एके ठिकाणी काम तुंबून राहणे, अडकून राहणे अशा स्वरूपात वेळही वाया जात नाही.
  1. सेल्स-काऊंटरवरती सेल्समनचा वेळ वाचेल अशा उपाययोजना करण्यासाठी…
  • सेल्समन डिलिव्हरी नोट कॉम्प्युटरवर न काढता, ॲपमधून थेट मोबाईलवरून काढू शकतो.
  • ग्राहकाला मोबाईलवरच लेबलचे मूल्यांकन (व्हॅल्युएशन) चटचट दाखवता येते, ज्यामुळे कॅलक्यूलेटरवरचा हिशेबाचा वेळ वाचतो.
  • ऑर्नामेंटचे पूर्ण डिटेल्स फोटोसह मोबाईलवरच ग्राहकाला दाखवता येतात.
  • ऑर्डर डिलिव्हरी नोटमध्ये कस्टमरचे नाव चटकन फीड करता येते. केवळ मोबाईल नंबर टाकून ग्राहकाची माहिती ऑटो येत असल्यामुळे काही सेकंदांमध्ये ग्राहक निवडणे शक्य होते.
  • अशा तऱ्हेने काऊंटरवरती, व्हॅल्युएशन, डिलिव्हरी नोट तयार करणे इत्यादी कामे मोबाईलवरून होत असल्यामुळे सेल्समनचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचतो.
  1. डिलिव्हरी आणि बिलिंग काऊंटरवरती; ग्राहकाला लवकर मोकळे करण्यासाठी…
  • केवळ मोबाईल नंबर टाकून ग्राहकाला अ‍ॅक्सेस करता येते. किंवा पॅन नंबर अथवा नावाची पहिली काही कॅरेक्टर्स टाकून ग्राहक निवडता येतो.
  • बिलाचा पेमेंट मोड स्वतंत्रपणे केव्हाही बदलता येतो.
  • डिस्काऊंट देण्यासाठी उचित वर्क फ्लो असल्यामुळे आणि कॉम्प्युटरवरूनच ऑथोरायझेशन होत असल्यामुळे, डिस्काऊंटच्या कामासाठी प्रत्यक्षात एका जागेवरून दुसर्‍या जागेवरती उठून जावे लागत नाही.
  • ओल्ड गोल्डसाठी स्वतंत्र काऊंटर असल्यामुळे डिलिव्हरी नोट किंवा बिलिंगवरती त्याच्या गर्दीचा ताण येत नाही.
  • डिलिव्हरी झाल्यानंतर ग्राहकांची प्रतिक्रिया घेण्यासाठी कॉल सेंटरची सुविधा असल्यामुळे दुकानातच कस्टमर फीडबॅक घेण्यामध्ये वेगळा वेळ जात नाही.

अशा तऱ्हेने, अ‍ॅक्मे इन्फिनिटीच्या मदतीने नवीन काऊंटर्स तयार करून, विभागून आलेली छोटी छोटी कामे प्रत्येकाने वेगाने करून आणि सेल्स-काऊंटरवरती सेल्समनचा वेळ वाचल्याने, शिवाय डिलिव्हरी आणि बिलिंग काऊंटरवरुन ग्राहकाला लवकर मोकळे केल्याने गर्दीच्या वेळीसुद्धा धांदल उडत नाही.

व्यवसायाच्या नव्या शाखा किंवा ब्रँचेस काढणे हे आधीच्या काळाच्या तुलनेत सध्या बरेच सोपे झाले आहे. परंतु, त्यासाठी पुढील मूलभूत गोष्टी स्वीकारणे महत्त्वाचे ठरते.

  1. बॅक ऑफिस (मेन ऑफिस) अधिक सक्षम करणे.
  • बॅक ऑफिसमधून ब्रँचेसना उत्तम पाठबळ (सपोर्ट) देत रहा.
  1. उच्चतम एच. आर. पॉलिसी अमलात आणणे.
  • मालकाच्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा शाखांमधून तेवढीच उत्तम ग्राहक सेवा देण्यासाठी विशेष प्रयत्न करा.
  1. ब्रँचेसवर चांगले नियंत्रण ठेवणे.
  • शाखांमधून ठरवलेल्या पद्धतीनेच कामकाज व्हावे यासाठी SOP किंवा आदर्श पद्धती आखणे.
  • सुरळीत कामकाजासाठी उत्तम व्यवस्थापन अमलात आणा.

अर्थात, नवीन शाखा सुरू करण्यासाठी स्ट्राँग बॅक ऑफिस, चांगली एच. आर. पॉलिसी, शाखांवरील नियंत्रणासाठी कंट्रोल्स आणि शाखांच्या कामकाजासाठी प्रमाणित पद्धती, या चार गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. आणि यासाठी ॲक्मे इन्फिनिटीमध्ये ब्रँच मॅनेजमेंट अंतर्गत निरनिराळी वैशिष्ट्ये दिली आहेत; जी पुढीलप्रमाणे काम करतात.

  1. बॅक ऑफिस (मेन ऑफिस) अधिक सक्षम करण्यासाठी…
  • सेंट्रलाइज्ड; कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट, कस्टमर फीडबॅक मेकॅनिझम, परचेसिंग, बार कोडिंग, फायनांशियल अकाउंटिंग अशा सोई आणि मोड्यूल्स इन्फिनिटीमध्ये उपलब्ध आहेत.
  • सॉफ्टवेअरमधून मल्टिपल लोकेशन्स किंवा ब्रँचेस तयार करता येतात आणि उपयोगकर्त्यांना (युजर्सना) त्या पद्धतीने अधिकार देता येतात.
  • कोणतेही अहवाल, उपयोगकर्त्यांचे अधिकार, हुद्दा; शाखांनुसार किंवा एकत्रित बघता येतात.
  • अशा वैशिष्ट्यांमुळे बॅक ऑफिस एकदम पॉवरफूल बनते आणि निरनिराळ्या ठिकाणी शाखा काढणे सोपे जाते.
  1. उच्चतम एच. आर. पॉलिसी अमलात आणण्यासाठी…
  • सेल्समनना इन्सेन्टिव्ह देऊन, त्यांना ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी आणि जास्तीत जास्त माल विकण्यासाठी प्रवृत्त करता येते. जसे…
    1. आयटम किंवा कॅटेगरीवर इन्सेन्टिव्ह.
    2. एखाद्या शाखेचे विक्रीचे लक्ष्य ठरवून त्या पद्धतीने इन्सेन्टिव्ह देता येतात.
    3. कलर स्टोन किंवा डायमंडच्या बाबतीत लूज विकले तर वेगळा इन्सेन्टिव्ह आणि तोच स्टडेडमध्ये विकला तर वेगळा इन्सेन्टिव्ह.
    4. MRP आयटमवर वेगळे इन्सेन्टिव्हज, इत्यादि.
  • ओल्ड गोल्ड पर्चेसमध्ये होणाऱ्या नफ्यावरती इन्फिनिटी योग्य पद्धतीने लक्ष ठेवते.
  • ग्राहकसेवेचा दर्जा, बॅक ऑफिसच्या कॉल सेंटरमधून किंवा काऊंटरवर ग्राहकाची प्रतिक्रिया घेऊन तपासता येतो. कॉल सेंटरमध्ये फीडबॅक घेताना ग्राहकाला विचारायचे प्रश्न इन्फिनिटीमध्ये सेट करून ठेवता येतात.
  • कॉल सेंटरचे कॉल रेकॉर्ड करून, त्यात जर काही त्रुटी असेल तर ते सेल्समनला ऐकवता येतात.
  • इन्फिनिटीच्या स्वतंत्र HR मोड्यूलमध्ये ऑर्गनायझेशन चार्ट, कर्मचार्‍यांची नेमणूक, अप्रायझल सिस्टिम, KPI अशा सुविधा दिलेल्या आहेत.
  • अशा तऱ्हेने चांगले काम करण्यासाठी आणि ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी सेल्समनना प्रेरित करता येते. त्यामुळे विविध शाखा असल्या तरी, बँकेप्रमाणे ओनरलेस कामकाज होत राहते. अर्थात, दुकानात मालक असताना जशी सेवा ग्राहकाला मिळते तशीच सेवा मालकाच्या अनुपस्थितीतही सेल्समन देत राहतात.
  1. ब्रँचेसवर चांगले नियंत्रण ठेवण्यासाठी…
  • सर्व शाखा हेड ऑफिसशी नेटवर्कमधून जोडता येतात.
  • ब्रँचमधील प्रत्येक व्यवहार रिअल टाईममध्ये (लगेचच) हेड ऑफिसला त्याच्या इफेक्टसह परावर्तित होतो.
  • ऑथोरायझेशन प्रोसेस आहे.
  • एक माणूस एखादी एन्ट्री करतो आणि दुसरा ती पास करतो किंवा ऑथोराइझ करतो अशी ’मेकर चेकर’ संकल्पनाही अमलात आणता येते. उदा. एखाद्या ऑर्नामेंटचे ब्रेकिंग केले म्हणजे ग्राहकाने नेकलेस मधील पेंडेंट घेतले नाही फक्त चेनच घेतली (RNG) तर त्याचे ऑथोरायझेशन दुसर्‍या काऊंटरवरती लगेच होते.
  • दिवसाच्या शेवटी, प्रत्येक ब्रँचचा डे एंड ठरवलेल्या प्रोसेसमधून करता येतो.
  • ब्रँचेसच्या बाबतीतील सर्व रिपोर्टींग हेड ऑफिसला ऑटो मिळत राहते.
  • कंट्रोलसाठी सर्व रिपोर्टिंग आणि ऑथोराइझेशन मोबाईलवर उपलब्ध आहे.
  • इन्फिनिटीमधील इनट्रान्झिट लोकेशनच्या व्यवस्थापनामुळे, स्टॉक ट्रान्सफर किंवा ब्रँच ट्रान्सफरमध्ये सुसूत्रता येते.
  • सॉफ्टवेअरमध्ये उपयोगकर्त्यानुसार, रोलनुसार, सिक्युरिटी सिस्टिम कार्यान्वित करता येते.
  • ब्रँचची ऑर्डर रिक्विजिशन आपोआप तयार होण्यासाठी ब्रँचच्या सेलनुसार, आयटमनुसार, कॅटेगरीनुसार, वेट रेंजनुसार रिऑर्डर लेव्हल सेट करता येते.
  1. शाखांमधून ठरवलेल्या पद्धतीनेच कामकाज होण्यासाठी….
  • निरनिराळ्या ब्रँचेसमधून समान पॉलिसी कार्यान्वित करता येते. जसे मेटल रेट किंवा मेकिंग चार्जेस अथवा डिस्काउंट पासिंगची पॉलिसी इत्यादी.
  • सर्व पॉलिसी डिसिजन हेड ऑफिसमधून सॉफ्टवेअरमध्ये सेट करता येतात. उदा. एखाद्या विशिष्ट ब्रँचचा गोल्ड रेट काय असायला हवा? हे हेड ऑफिसमधून एखादे सूत्र ठरवून त्याप्रमाणे सेट करता येते. किंवा याचप्रमाणे एकच बार कोड लेबल वेगवेगळ्या ब्रँचेसमध्ये वेगवेगळ्या मेकिंग चार्जेसला देता येते. अशाच प्रकारे रेट फ्रीझ करायचा असेल तर ॲडव्हान्सची विशिष्ट रक्क्म भरल्यानंतर संबंधित रेट फ्रीझ होईल अशी पॉलिसी सर्व शाखांमधून सेट करून ठेवता येते.
  • इन्फिनिटीच्या वर्क फ्लो मोड्यूलमध्ये SOP प्रमाणे करावयाच्या निरनिराळ्या प्रोसेसचे वर्क फ्लो डिफाईन करता येतात आणि कार्यान्वितही करता येतात.

एकंदरितच शाखा विस्तार करायचा तर शाखेसाठी जी पद्धती किंवा पॉलिसी ठरवू ती कार्यान्वित करण्याची क्षमता ॲक्मे इन्फिनिटीमध्ये आहे. म्हणूनच नवीन ब्रँच काढून व्यवसाय वाढवण्याचा विचार असेल तर एकापेक्षा जास्त शाखांचे कामकाज करण्यासाठी ॲक्मे इन्फिनिटी हे सुयोग्य सॉफ्टवेअर आहे.