1. या स्पर्धेच्या युगात दुकानाचे सध्याचे ग्राहक, दुकानाशी बांधलेले राहण्यासाठी काय करावे?

1. या स्पर्धेच्या युगात दुकानाचे सध्याचे ग्राहक, दुकानाशी बांधलेले राहण्यासाठी काय करावे?

स्पर्धेच्या युगामध्ये आपले सध्याचे ग्राहक आपल्याशी बांधलेले राहण्यासाठी ग्राहकांशी असलेले हितसंबंध अधिक दृढ करण्याची आवश्यकता असते, जे काम मुख्यत्वे चार प्रकारे केले जाऊ शकते;

  1. ग्राहकांना जास्तीत जास्त समजून घेणे.
  • ग्राहकांची इत्थंभूत माहिती गोळा करा.
  • ग्राहकांच्या माहितीचे उत्तम विश्लेषण करा.
  • ग्राहकांच्या आवडी-निवडी ओळखा.
  1. दुकानात ग्राहकांना पावलोपावली उत्तम सेवा देणे.
  • दुकानासंदर्भात ग्राहक जी काही कृती करतात, त्या कृतीमध्ये प्रत्येक ठिकाणी ग्राहकाला उत्तम अनुभव मिळेल यासाठी प्रयत्नशील रहा.
  1. ग्राहकांकरिता फायदेशीर/सुखकारक योजना राबवणे.
  • जसे, सेव्हिंग स्कीम, गिफ्ट व्हाऊचर, लॉयल्टी प्रोग्राम इत्यादी.
  1. ग्राहकांना दुकानाबाबत सातत्याने अपडेटेड ठेवणे.
  • नियमित सीआरएम कॅम्पेन राबवून किंवा ग्राहकांशी संवाद साधून, त्यांच्यामध्ये दुकानाबद्दल जवळीक निर्माण करा, जेणेकरून ते दुकानात येण्यासाठी प्रवृत्त होतील.

यासाठी ॲक्मे इन्फिनिटीमध्ये कस्टमर रिलेशनशिप मोड्यूल (सीआरएम) उपलब्ध आहे; जे दुकानांच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार, वेगवेगळ्या पद्धतीने कार्यान्वित करता येते. वरील चारही मुद्द्यांसंदर्भात इन्फिनिटीचे सीआरएम मोड्यूल पुढीलप्रमाणे काम करते.

  1. ग्राहकांना जास्तीत जास्त समजून घेण्यासाठी…
  • ॲक्मे इन्फिनिटी ग्राहकांची इत्थंभूत माहिती; जसे नाव, पत्ता, ई-मेल, फोन नं., मोबाईल नं., जन्मदिवस, लग्नाचा वाढदिवस, त्यांचे मूळ स्थान इत्यादि, व्यवस्थित सेव्ह करून ठेवते.
  • आपल्याकडून खरेदी केलेले दागिने वस्तूत: कोण वापरणार आहे हे ही सॉफ्टवेअर सेव्ह करते.
  • विक्रीच्या माहितीवरून कोणत्या प्रकारचा ग्राहक, कोणत्या प्रकारचा माल, कोणत्या कारणासाठी आपल्याकडून खरेदी करतो याचे विश्लेषण करणारे अहवालही सॉफ्टवेअर देते, ज्यावरून ग्राहकांची आवड ओळखण्यास आणि त्यांना समजून घेण्यास मदत होते.
  • इन्फिनिटीमध्ये ग्राहकांची खरेदी क्षमता सांगणारे अहवालसुद्धा उपलब्ध आहेत.
  1. ग्राहकांना पावलोपावली उत्तम सेवा देण्यासाठी…
  • यामध्ये, दुकानात येणाऱ्या ग्राहकांशी जिथे जिथे संवाद साधला जातो, जिथे त्यांच्याशी संबंध येतो आणि जिथे वेगवेगळ्या कृती घडतात, ती वेगवेगळी ठिकाणे नमूद केलेली आहेत; जसे, पार्किंग, दुकानाचा दरवाजा,सेल्स-बिलिंग सारखी काऊंटर्स इत्यादी.
  • अशा प्रत्येक ठिकाणी उत्तम सेवा कशी द्यायची, उत्तर कसे द्यायचे, वर्तणूक कशी असायला हवी आणि उत्तम संवाद कसा साधायचा, याची प्रोसेस किंवा सिस्टिम तुम्ही तयार करू शकता. ही सिस्टिम कार्यान्वित करण्यासाठी इन्फिनिटीमध्ये आवश्यक तो वर्क-फ्लो तयार करता येतो.
  1. ग्राहकांकरिता फायदेशीर/सुखकारक योजना राबवण्यासाठी…
  • यामध्ये सेव्हिंग स्कीम, गोल्ड डिपॉझिट स्कीम, लॉयल्टी स्कीम, गिफ्ट व्हाउचर्स, डिस्काउंट कुपन्स अशा योजनांचा समावेश आहे.
  • या योजनांअंतर्गत, ग्राहकाने केलेल्या छोट्यात छोट्या व्यवहारांचीही व्यवस्थित नोंदणी राहते. जसे सेव्हिंग स्कीमचा नियमित हप्ता किंवा दिलेले PDC (POST DATED CHEQUE) इत्यादी
  • लॉयल्टी प्रोग्राममध्ये ग्राहकाला त्याच्या परिवाराच्या खरेदीचाही मोबदला देता येतो. शिवाय, ग्राहकाला वेगवेगळे डिस्काउंटसुद्धा देता येतात.
  • गिफ्ट व्हाउचरमुळे नियमित ग्राहकांव्यतिरिक्त, बाहेरचे ग्राहक आपल्या दुकानात येण्यास मदत होते. गिफ्ट व्हाउचर्ससाठी निश्चित (स्थिर) किंवा बदलत राहतील अशा दोन्हीही डिनॉमिनेशनचा वापर करता येऊ शकतो.
  1. ग्राहकांना दुकानाबाबत सातत्याने अपडेटेड ठेवण्यासाठी…
  • सॉफ्टवेअरची मदत घेऊन निरनिराळी सीआरएम कॅम्पेन कार्यान्वित करता येतात; जी ग्राहकांनुसार ठराविक किंवा विशेष निकषांवर (ॲट्रीब्युट) आधारित असू शकतात. ठराविक प्रकार किंवा ठराविक गुणधर्म असे निकष लावून सीआरएम कॅम्पेन तयार केल्यावर, संबंधित ग्राहकांसाठी माध्यम काय असायला हवे हे सुद्धा ठरवता येते. सीआरएम कॅम्पेन्स दरम्यान ज्या गुडीज द्यायच्या त्या सॉफ्टवेअरमध्ये नमूद करता येतात.
  • जन्मदिनी किंवा लग्नाच्या वाढदिवसाला अभिनंदनाचे, शुभेच्छांचे एसएमएस पाठवता येतात.
  • सीआरएम कॅम्पेन्सची यशस्विताही तपासता येते.
  • ग्राहककेन्द्रित (सीआरएम) कॅम्पेन्स करता येतात; जसे, आपला एखादा ग्राहक गेल्या वर्षी आपल्याकडच्या एखाद्या योजनेला आलेला नसेल तर त्याला आपण एसएमएस किंवा फोन करून आमंत्रित करू शकतो. किंवा नियमित ग्राहकांनी सेव्हिंग स्कीमचे नूतनीकरण केले नसल्यास तसा तो फिल्टर लावून, ग्राहकांची यादी तयार करता येते. त्यांना फोन करून नवीन स्कीम चालू करण्याबाबत प्रोत्साहन देता येते.

अशा पद्धतीने, ॲक्मे इन्फिनिटी सॉफ्टवेअरमधून, ग्राहकांच्या माहितीचे व्यवस्थापन आणि विश्लेषण करून ग्राहकाला समजून घेणे, त्याला दुकानात आल्यावर पद्धतशीरपणे पावलोपावली उत्तम सेवा देणे, नवनवीन ग्राहकोपयोगी योजना राबवणे आणि नंतर ग्राहकेन्द्रित (सीआरएम) कॅम्पेन्स राबवून त्यांना वारवांर दुकानात येण्यासाठी प्रवृत्त करणे, अशा प्रयत्नातून उत्तम ग्राहक हितसंबंध तयारही करता येतात आणि जपताही येतात.

शेवटी…. ग्राहक देवो भव:।