6. ऑर्डरच्या दागिन्याचा फॉलोअप वेळेवर होत नसल्याने ऐन वेळी गडबड होते. हे कसे टाळायचे?
ऑर्डरच्या दागिन्यांचा फॉलोअप वेळच्यावेळी करून ग्राहकाला ठरलेल्या वेळेत, ठरलेल्या दर्जाचे आणि ठरलेल्या बजेटमध्ये किंवा त्याच्या आसपासच्या बजेटमध्ये दागिने देणे फार महत्त्व्याचे आहे. कारण त्यामुळे ग्राहकाचा आपल्यावरचा विश्वास दृढ होण्यास मदत होते. त्यासाठी खालील गोष्टी करणे मात्र गरजेचे आहे.
- ऑर्डर योग्य पद्धतीने घेणे.
- ऑर्डर घेतानाच ऑर्डरचे सर्व पॅरामिटर्स व्यवस्थित नोंद करून घ्या.
- ग्राहकाकडून ऑर्डर घेतल्यापासून ती ग्राहकाला देण्यापर्यंतची कामाची संपूर्ण साखळी कार्यक्षम करणे.
- ऑर्डरिंगच्या कामासाठी पद्धतशीर कार्यपद्धतीचा अवलंब करा.
- ऑर्डरचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी अलर्ट रिमाईंडर पद्धत रुजवा.
- ऑर्डरचे दागिने वेळेत मिळण्यासाठी कारागिराला वेळोवेळी रिमांइड करा.
- ऑर्डरचे दागिने वेळेत घेऊन जाण्यासाठी ग्राहकालाही रिमाईंडर द्या.
- कस्टमरच्या रिपेअर ऑर्डरची कामेदेखील वेळेत पूर्ण करा.
- रिपेअर ऑर्डरसाठीसुद्धा कार्यक्षम पद्धती तयार करा.
यामुळे एकंदरीतच ग्राहक त्याच्या ऑर्डरविषयी समाधानी आणि आनंदी राहतो. वरील सर्व कामे ऑटोमेट करण्यासाठी ॲक्मे इन्फिनिटीमध्ये कस्टमर ऑर्डर प्रोसेसिंग हे खास मोडयूल दिलेले आहे जे पुढीलप्रमाणे काम करते.
- ऑर्डर योग्य पद्धतीने घेण्यासाठी…
- ऑर्डर घेताना अत्यंत छोट्या छोट्या गोष्टींचा तपशील सॉफ्टवेअरमध्ये टाकता येतो.
- ऑर्डर; शॉप सॅम्पल आहे की कस्टमर सॅम्पल? की ऑर्डर म्हणून दुकानातीलच एखादा आयटम निवडलेला आहे? की एखाद्या वर्णनावरुन ऑर्डर बनणार आहे? हे स्पष्ट नमूद करून ठेवता येते.
- ऑर्डरच्या माहितीसोबत एखादी इमेज किंवा फोटो ॲटॅच करता येतो.
- ऑर्डरसाठी कस्टमर सॅम्पल किंवा कस्टमर स्टोन्स असतील तर त्याची इत्थंभूत नोंद ठेवते.
- ग्राहकाकडून ऑर्डर घेतल्यापासून ती ग्राहकाला देण्यापर्यंतची कामाची संपूर्ण साखळी कार्यक्षम करण्यासाठी…
- एक दुकान किंवा एकाहून अधिक शाखा या दोहोंसाठी प्रॉपर ऑर्डर फ्लो उपलब्ध आहे.
- ऑर्डर जर सिलेक्टेड आयटम असेल तर तो आयटम लगेचच ऑर्डर पेटीमध्ये ट्रान्स्फर करता येतो. ऑर्डर सिलेक्टेड नसेल तर हेड ऑफिसला, वेगवेगळ्या ब्रँचेस किंवा वेगवेगळ्या काउंटरवरच्या ऑर्डर्स, कारागिराला देण्यासाठी डिस्प्ले होत राहतात.
- घेतलेल्या ऑर्डर्स हातोहात नेहमीच्या ठराविक कारागिराला किंवा ऑर्डरनुसार योग्य कारागिराला सुपूर्द करता येतात.
- दिवसाच्या शेवटी ज्या त्या कारागिरांना त्यांच्या त्यांच्या ऑर्डर्स; स्लिप प्रिंट करून अथवा मेलने कळवता येतात. यामध्ये काउंटरवर घेतलेल्या ऑर्डरच्या सर्व तपशीलांबरोबर कारागिराला कळवायच्या अतिरिक्त गोष्टीही समाविष्ट असतात.
- कारागिराकडून ऑर्डरचे मटेरिअल आल्यानंतर त्याची योग्य पद्धतीने नोंद करता येते. उदा. ऑर्डरपेक्षा जर वजन वाढले असेल तर वाढलेले वजन स्वतंत्रपणे टाकता येते, इत्यादी.
- तपासलेला ऑर्डरचा दागिना बार कोडिंग करून ज्या त्या ब्रँचला किंवा काउंटरला अचूक पोहचवला जातो.
- ऑर्डरमध्ये शॉप सॅम्पल किंवा कस्टमर सॅम्पल असेल तर ऑर्डर कारागिराला देताना त्याचा रिमाईंडर मिळतो.
- पुढे काउंटरवरून ऑर्डर ग्राहकाला दिल्यानंतर तिचे अचूक बिल तयार होते.
- ऑर्डरच्या कामाची ही संपूर्ण साखळी; सर्व बारीकसारीक गोष्टी ध्यानात घेऊन तयार केलेली आहे.
- ऑर्डरचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी…
- इन्फिनिटी; प्रत्येक लेव्हलला होणाऱ्या बारीकसारीक व्यवहारांवर लक्ष ठेवते व त्याचा अलर्ट प्रत्येक संबधित व्यक्तीला देत राहते.
- संबधित व्यक्तींना; काम योग्य वेळेत पूर्ण करण्यासाठी सॉफ्टवेअर सातत्याने रिमाईंडर्स देत राहते.
- ऑर्डर घेतल्या बरोबर हेड ऑफिसच्या माणसाला कोठे कोठे, काय काय ऑर्डर घेतली आहे हे ऑटो कळत राहते.
- ऑर्डर कारागिराला दिल्यानंतर, त्याला त्या दिवशी ज्या ऑर्डर्स द्यायच्या आहेत त्याचा रिमाईंडरचा एस.एम.एस. आदल्या दिवशीच पाठवता येतो. आणि तसा अहवाल दररोज सकाळी हेड ऑफिसच्या ऑर्डर व्यवस्थापकाला मिळत राहतो.
- ग्राहकाला ऑर्डर तयार असण्याचा एस.एम.एस. पाठवता येतो. शिवाय वेबसाइटवरून किंवा ॲपमधूनही ग्राहकाला ऑर्डर स्टेट्स कळत राहतो.
- ऑर्डर तयार होऊनसुद्धा ग्राहकाने ती लगेच नेली नाही तर त्याचाही नियमित फॉलोअप ग्राहकाशी करता येतो. अशा पद्धतीने ऑर्डरचा सतत फॉलोअप करत राहिल्यामुळे कस्टमरला ती योग्य वेळेत देता येते.
- कस्टमरच्या रिपेअर ऑर्डरची कामेदेखील वेळेत पूर्ण करण्यासाठी…
- ग्राहकाने रिपेअरसाठी दिलेला आयटमसुद्धा एक प्रकारची मेक टू ऑर्डरच असते. त्याच्यासाठी रिपेअरचा उचित प्रोसेस फ्लो इन्फिनिटीमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये ग्राहकाकडून आलेला आयटम कारागिराला देणे, त्याची दुरुस्ती किंवा बदल करणे, वजन वाढवणे, स्टोन्स वाढवणे, काम झाल्यावर तो परत ग्राहकाला देणे, अशी सर्व छोटी मोठी कामे तपशीलवार समाविष्ट आहेत.
- रिपेअर ऑर्डरचेसुद्धा रिमाईंडर आणि अलर्ट सातत्याने मिळत राहतात.
- रिपेअर ऑर्डर ग्राहकाला दिल्यानंतर तिचे अचूक बिल तयार होते. उदा. जर वजन वाढून आले असेल तर त्याची स्वतंत्रपणे नोंद होऊन वाढलेल्या वजनाचे बिलिंग ग्राहकाला योग्य प्रकारे करता येते.
अशा पद्धतीने ग्राहकाला ठरलेल्या वेळेत, ठरलेल्या दर्जाचे दागिने योग्य किमतीला देण्यासाठी फॉलोअप मेकॅनिझम आणि त्याचबरोबर रिपेअरिंगची कार्यक्षम प्रणाली ॲक्मे इन्फिनिटीमध्ये दिली असल्यामुळे, ग्राहकांचा आपल्या सर्व्हिसबाबत विश्वास अधिक दृढ होतो.
Leave A Comment