5. जुन्या सोन्याचा व्यवहार हा ज्वेलरी व्यवसायाचा अविभाज्य भाग आहे, त्यात नेमका किती फायदा होतो हे समजण्यासाठी काय करावे?

5. जुन्या सोन्याचा व्यवहार हा ज्वेलरी व्यवसायाचा अविभाज्य भाग आहे, त्यात नेमका किती फायदा होतो हे समजण्यासाठी काय करावे?

ज्वेलरी व्यवसायातील विक्रीचा एक मोठा हिस्सा; ‘जुन्या सोन्याच्या बदल्यात नवे दागिने देणे’ या एक्स्चेंज सेलवर अवलंबून असतो. अशा जुन्या सोन्याच्या व्यवहारात; त्याच्या फायद्यापर्यंत पोहचण्यासाठी पुढील चार गोष्टी करणे आवश्यक आहे.

  1. जुने सोने, जुने दागिने योग्य किमतीने खरेदी करणे.
  • जुने सोने खरेदी करण्याची उचित पद्धत तयार करा.
  • जुने सोने कटाक्षाने; ठरलेल्या पद्धतीप्रमाणेच खरेदी करा.
  1. खरेदी केलेल्या जुन्या सोन्यामधून अधिक फायदा करून घेणे.
  • जुन्या सोन्याचे वर्गीकरण करा. जसे शुद्ध सोने किंवा वेढणे, परत वापरता येण्याजोगे दागिने आणि मेल्टिंगसाठीचे सोने, इत्यादि.
  • शुद्ध सोने थेट बुलियन (वळे किंवा बिस्किट) म्हणून विक्रीस उपलब्ध करा.
  • परत वापरता येण्याजोगे दागिने थोड्या पॉलिशिंग आणि डागडुजीनंतर थेट नवे दागिने म्हणून विक्रीस ठेवा आणि फायदा वाढवा.
  • उरलेले; थेट विक्री न करता येण्याजोगे; जुने सोनेच मेल्टिंगसाठी पाठवा.
  1. मेल्टिंगसाठीच्या सोन्यामधील फायदा-तोटा तपासून घेणे.
  • मेल्टिंगसाठीचे सोने उचित पद्धतीनेच मेल्टिंग आणि रिफायनिंग करून घ्या.
  • मेल्टिंगनंतर त्याची शुद्धता; आपण ठरवलेल्या शुद्धतेशी आणि दिलेल्या किमतीशी जुळवून पहा.
  1. जुन्या सोन्यातील फायदा अकाउंटिंगमध्येही अचूक समोर येणे.
  • जुन्या सोन्याचे अकाउंटिंग व्यवस्थित करा.
  • जुन्या सोन्यातील फायदा ट्रेडिंग अकाउंटमध्ये परावर्तित होण्यासाठी योग्य पद्धती तयार करा.

वरील सर्व कामे सहज आणि अचूक होण्यासाठी ॲक्मे इन्फिनिटीमध्ये खास सुविधा आणि रिफायनरी मोड्यूल दिलेले आहे जे पुढील प्रमाणे काम करतात.

  1. जुने सोने, जुने दागिने योग्य किमतीने खरेदी करण्यासाठी….
  • पॉलिसीप्रमाणे; विक्रीच्या दरावर अवलंबून असलेला, जुन्या सोन्याच्या खरेदीचा दर फॉर्म्युलाद्वारे सॉफ्टवेअरमध्ये सेट करून ठेवता येतो.
  • यामध्ये; सोने केवळ खरेदी करणार असू तर वेगळा दर आणि एक्स्चेंज करणार असू (जुने सोने घेऊन नवीन दागिने देणार असू) तर वेगळा दर असे सेट करता येते.
  • खरेदी केले जाणारे जुने सोने, स्वत:च्या दुकानातून विकलेले आहे का दुसऱ्या दुकानातून विकले आहे असे वर्गीकरण करून, त्यानुसार त्याच्या एस्टीमेटेड फाईन वेटचा हिशेब करता येतो.
  • स्वत:च्या दुकानातून विकल्या गेलेल्या सोन्यासाठी कॅरेटनुसार योग्य पद्धतीने दर घेण्याची आणि दुसऱ्या दुकानातून विकल्या गेलेल्या सोन्यासाठी, त्याची शुद्धता तपासून त्यानुसार दर लावण्याची (त्याचे एस्टीमेटेड फाईन वेट घेण्याची) सोय इन्फिनिटीमध्ये दिलेली आहे. आता गोल्ड टेस्टिंगमुळे यामध्ये अधिक अचूकता आणणे सोपे झाले आहे.
  • अशा वैशिष्ट्यांमुळे जुने सोने योग्य किमतीने खरेदी करून नुकसान टाळता येते.
  1. खरेदी केलेल्या जुन्या सोन्यामधून अधिक फायदा करून घेण्यासाठी…
  • सॉफ्टवेअरमध्ये दिवसाच्या शेवटी दिवसभरातील जुन्या सोन्याची स्वतंत्र बॅच तयार करता येते.
  • या बॅचमधून बुलियन (कॉईन्स) आणि जे दागिने पॉलिश करून वापरणे शक्य आहेत असे दागिने, सहज वेगवेगळे करता येतात.
  • पुढे उरलेले सोने आपोआप मेल्टिंग प्रोसेससाठी पाठवले जाते.
  • असे वर्गीकरण केल्यामुळे जुन्या सोन्याच्या व्यवहारामध्ये नफा वाढण्यास मदत होते.
  1. मेल्टिंगसाठीच्या सोन्यामधील फायदा-तोटा तपासून घेण्यासाठी…
  • मेल्टिंगला दिलेले सोने परत आल्यावर, त्यातील एक तुकडा लॅब सॅम्पल म्हणून बाजूला काढून, लॅबमध्ये त्याची शुद्धता स्वतंत्रपणे तपासता येते.
  • लॅब सॅम्पल काढून उरलेले सोने मेटल बॉल रिफायनिंगसाठी पाठवून त्याचे फाईन वेट काढता येते.
  • आता गिऱ्हाईकाला दिलेल्या पैशाच्या मोबदल्यात मिळालेले जुने सोने, लॅब रिपोर्ट आणि शेवटी राहिलेले फाईन गोल्ड, यामध्ये किती नफा किंवा तोटा झाला हे बॅच (लॉट) तयार केल्यामुळे अचूक आणि सहज समजते.
  • ह्या बॅचेस ब्रँचनुसारही करता येतात. ज्यामुळे जुन्या सोन्यातील नफा ब्रँचनुसारही कळू शकतो.
  • ह्या बॅचेस डेटनुसारही तयार करता येतात.
  1. जुन्या सोन्यातील फायदा अकाउंटिंगमध्येही अचूक समोर येण्यासाठी…
  • जुन्या सोन्याचे स्वतंत्र ट्रेडिंग अकाउंट सॉफ्टवेअरमध्ये तयार करता येते.
  • कारागिराला देऊन फाईन आल्यानतंर, जुने सोने जेव्हा 22 कॅरेट, स्टँडर्ड बार किंवा कॉइनला रूपांतरित होते आणि नवीन ऑर्नामेंटला कन्व्हर्ट केलेल्या जुन्या सोन्याचे मूल्यांकन, आपोआप URD वेटेड ॲव्हरेजवरून होते.
  • यामुळे ट्रेडिंग अकाउंटमध्ये आपल्याला जुन्या सोन्याच्या व्यवहारातील नफा कळत राहतो.

अशा पद्धतीने, ॲक्मे इन्फिनिटी सॉफ्टवेअरमधून, जुन्या सोन्याची योग्य किंमत मिळवता येते, त्याचे वर्गीकरण करून त्यात नफा वाढवता येतो, मेल्टिंगनंतर त्यातील फायदा-तोटा अचूक तपासता येतो आणि महत्त्वाचे म्हणजे जुन्या सोन्याच्या व्यवहारातील नफा स्वतंत्र ट्रेडिंग अकाऊंटमध्ये पाहता येतो. आणि त्यामुळेच जुन्या सोन्याच्या व्यवहारात मालकाला अडकून रहावे लागत नाही. म्हणतात ना.. जुने ते सोने, अर्थात जुने ते फायद्याचे!