2. ज्वेलरी व्यवसायात बरेच छोटे छोटे आणि जटिल व्यवहार असतात, शिवाय सोन्याचा दरही सतत बदलत असतो. त्यामुळे व्यवसायातील फायदा अचूक मोजणे अवघड जाते. यासाठी काय करता येईल?
- ट्रेडिंग अकाउंटमधून ग्रॉस प्रॉफिट वेळोवेळी तपासत राहणे.
- जटिलपणामुळे ज्वेलरी व्यवसायामध्ये तयार करायला किचकट असे ट्रेडिंग अकाउंट, पद्धतशीरपणे; जास्तीत जास्त सुटसुटीत बनवत रहा.
- ग्रॉस प्रॉफिटच्या टक्केवारीनुसार वेगवेगळी ट्रेडिंग अकाउंट तयार करा.
- वरील छोट्या स्टेप्स घेतल्याने ज्वेलरी व्यवसायाची प्रॉफिटॅबिलिटी जास्त चांगल्या तऱ्हेने आणि सोप्या पद्धतीने समजत राहते.
- ज्वेलरीमधील इन्व्हेंटरी खूप कॉस्टली असल्यामुळे; प्रॉफिटॅबिलिटीकरिता कॅश फ्लो वर सुद्धा लक्ष ठेवणे.
- प्रत्येक बिलामध्ये होणारा ग्रॉस प्रॉफिट कळावा अशी सोय करणे.
- दागिना आल्यानंतर तो विकला जाईपर्यंत सर्व कामे एका सुसूत्र साखळी पद्धतीमध्ये बांधा.
- इन्व्हेंटरीमधील कुठल्या आयटम्स मध्ये काय प्रॉफिटॅबिलिटी आहे हे शोधून काढा. उदा. ऑर्नामेंट किती रुपयाला आले, किती रुपयाला विकले इत्यादी.
- प्रॉफिटॅबिलिटीमध्ये इन्व्हेन्टरी कॅरिंग डेजचेही कन्सिडरेशन करणे.
- मायक्रो लेव्हलला कोणत्याही इन्व्हेन्टरीची, इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्ट म्हणजे सदर दागिना दुकानात किती दिवस होता हे तपासा.
- व्यवसायात इन्व्हेंटरी किती वेळा रोटेट होते किंवा ज्वेलरीचा इन्व्हेंटरी टर्न ओव्हर रेशो काय आहे यावरही लक्ष ठेवा. यामुळे किती इंटरेस्ट लॉस किंवा ऑपॉर्च्युनिटी लॉस झाला हे पण लक्षात येते.
एकंदरीतच, ज्वेलरी व्यवसायातील प्रॉफिटॅबिलिटी तपासायची तर जटिल व्यवहारांच्या अचूक नोंदी ठेवणे, ट्रॅडीशनल बुक्स ऑफ अकाउंटिंगमधून ग्रॉस प्रॉफिट पाहणे, प्रॉफिटॅबिलिटीसाठी ॲडव्हान्स अकाउंटिंगमधील कॅश फ्लोसारख्या स्टेटमेंट्सवर लक्ष ठेवणे, शिवाय इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्टसह प्रत्येक ऑर्नामेंटमध्ये किती ग्रॉस प्रॉफिट झाला आणि इन्व्हेंटरीचे किती टर्न होतात यांचे अहवालही बघणे गरजेचे असते.
हे सर्व योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी ॲक्मे इन्फिनिटीमध्ये, ज्वेलरी व्यवसायातील छोट्या छोट्या आणि किचकट, तसेच जटिल व्यवहारांची तपशीलवार नोंद ठेवण्याची सोय दिली आहे, ज्याचे ते अचूक अकाउंटिंगही करते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते या सर्व नोंदींचे पोस्टिंग किंवा रूपांतरण; प्रॉफिटॅबिलिटी सहज समजेल अशा अहवालांमध्ये करते जे पुढीलप्रमाणे आहे.
- ट्रेडिंग अकाउंटमधून ग्रॉस प्रॉफिट वेळोवेळी तपासत राहण्यासाठी…
- ज्वेलरी व्यवसायाचे तयार करायला किचकट असे ट्रेडिंग अकाउंट, ॲक्मे इन्फिनिटी; सहज आणि पद्धतशीरपणे जास्तीत जास्त सुटसुटीत प्रकारे तयार करते.
- इन्फिनिटीमध्ये वेगेवगळी ट्रेडिंग अकाउंट तयार करता येतात. जसे… स्टँडर्ड बार, 22 कॅरेट ऑर्नामेंट, 18 कॅरेट ऑर्नामेंट, डायमंड ज्वेलरी, MRP किंवा गिफ्ट आर्टिकल, लुज डायमंड, ओल्ड गोल्ड किंवा ओल्ड सिल्व्हर इत्यादींचे वेगवेगळे ट्रेडिंग अकाउंट. यामुळे प्रत्येक विभागातील प्रॉफिटॅबिलिटीचा स्वतंत्रपणे अंदाज येत राहतो.
- कारागिराच्या किंवा मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस संदर्भात, ट्रेडिंग अकाउंटमध्ये, 24 कॅरेट इश्यू गोल्ड, गोल्डस्मिथ इश्यू रिसिट, वर्क इन प्रोग्रेस शिवाय कारागिराकडे किंवा सबकॉन्ट्रॅक्टरकडे दिलेले इतर मटेरिअल अशा सर्व गोष्टींचा अंतर्भाव केला जातो.
- ट्रेडिंग अकाउंटमध्ये, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये होणारा प्रॉफिट-लॉस आणि तूट-वेस्टेजचा हिशेबसुद्धा लक्षात घेतला जातो.
- ट्रेडिंग अकाउंटमध्ये, कन्व्हर्जनच्या नोंदीसुद्धा योग्य पद्धतीने परावर्तित होतात. जसे, ओल्ड गोल्डमधून काही आयटम न्यू गोल्डमध्ये टाकणे किंवा न्यू गोल्डमधील काही आयटम ओल्ड गोल्डमध्ये रूपांतरित करणे इत्यादि.
- ट्रेडिंग अकाउंट केवळ अमाऊंटमध्ये न मिळता वेटमध्ये सुद्धा मिळते. म्हणजेच व्हॅल्युएशनसाठी ट्रेडिंग अकाउंटच्या दोन मेथड्स उपलब्ध आहेत. 1. वेटेड ॲव्हरेज मेथड आणि 2. करंट रेटने व्हॅल्युएशन.
- कंपनीच्या ट्रेडिंग अकाउंटबरोबर, प्रत्येक ब्रँचनुसारही वेगवेगळी परंतू परिपूर्ण ट्रेडिंग अकाउंट काढता येतात. ही सुविधा ब्रँच अकाउंटिंगच्या दृष्टीने उपयोगी असते.
- ट्रेडिंग अकाउंटमध्ये, बुक्स ऑफ अकाउंटचा स्टॉक आणि दुकानातील प्रत्यक्ष स्टॉक यांचे रिकन्सिलीएशन स्टेटमेंटसुद्धा इन्फिनिटीमध्ये उपलब्ध आहे, जे अगदी ज्वेलरी व्यवसायाच्या दृष्टीने अनभिज्ञ व्यक्तीलाही सहज समजू शकते. जसे, बँकेचे अधिकारी वगैरे.
- नेट प्रॉफिट समजण्यासाठी प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटची सोय इन्फिनिटीमध्ये दिली आहे.
- ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस ही दोन्ही स्टेटमेंटस सॉफ्टवेअरमध्ये सतत अद्ययावत उपलब्ध असतात.
- एकंदरीतच, ॲक्मे इन्फिनिटीमध्ये सर्वात व्यापक आणि सर्वसमावेशक पद्धतीचे ट्रेडिंग अकाउंट उपलब्ध आहे जे ज्वेलरी व्यवसायातील प्रॉफिटॅबिलिटी अचूक समोर आणते.
- प्रॉफिटॅबिलिटीकरिता कॅश फ्लोवर लक्ष ठेवण्यासाठी…
- स्वतंत्र कॅश फ्लो स्टेटमेंट इन्फिनिटीमध्ये उपलब्ध आहे.
- यामध्ये कॅशचा ऑपरेशनल वापर, गुंतवणुकीच्या दृष्टीने केलेला वापर, आर्थिक व्यवहारांसाठी केलेला वापर, वेगवेगळ्या पद्धतीने दर्शविला जातो.
- यामुळे ॲडव्हान्स अकाउंटिंग युजरला, बिझनेसची प्रॉफिटॅबिलिटी, ही ग्रॉस प्रॉफीट आणि नेट प्रॉफीटच्याही पुढे जाऊन, कॅश फ्लोद्वारेही बघणे शक्य होते.
- प्रत्येक बिलामध्ये होणारा ग्रॉस प्रॉफिट कळण्यासाठी…
- दागिना खरेदी करतेवेळीस किंवा गोल्डस्मिथ रिसीट करतेवेळीस, लेबर चार्जेस, मेकिंग चार्जेस आणि इतर पर्चेस कॉस्ट व्यवस्थित भरण्याची सोय इन्फिनिटीमध्ये आहे. त्यामुळे यावरून बारकोडिंग करताना, सर्व पर्चेस कॉस्ट ऑटो कॅरी फॉरवोर्ड होऊन सिक्युअर्ड पद्धतीने स्टोअर्ड राहतात. त्यामुळे कोणताही दागिना विकल्यानंतर सदर दागिन्याची पर्चेस कॉस्ट काय होती, त्यामध्ये किती ग्रॉस प्रॉफिट मिळाला हे एका सिम्पल रिपोर्टमधून समजत राहते.
- दागिन्यांच्या संदर्भातील ग्रॉस प्रॉफिटचा अहवाल आयटम कॅटेगरी नुसारही मिळतो.
- प्रॉफिटॅबिलिटीमध्ये इन्व्हेन्टरी कॅरिंग डेजचे कन्सिडरेशन करण्यासाठी…
- दागिन्यांच्या संदर्भातील ग्रॉस प्रॉफिटच्या अहवालांमध्ये इन्व्हेंटरी कॅरिंग डेज दरम्यान; इन्व्हेंटरीवर लागणाऱ्या इंटरेस्टचा सुद्धा हिशेब केला जातो. त्यामुळे प्रत्येक ऑर्नामेंटमागचे ग्रॉस प्रॉफिट अगदी अचूक कळत राहते.
- दागिन्यांच्या मुव्हमेंटचा प्रॉफिटॅबिलिटीवर होणारा परिणाम पाहण्यासाठी क्लोजिंग स्टॉक व्हर्सेस सेल्स रिपोर्ट; आयटम कॅटेगरी किंवा दिवसांनुसार सुद्धा इन्फिनिटीमध्ये उपलब्ध आहेत, ज्यावरून इन्व्हेंटरी किती वेळा रोटेट झाली किंवा इन्व्हेंटरी टर्न ओव्हर रेशो सहज समोर येतो.
ह्या तपशीलवार गोष्टी, इन्व्हेंटरीच्या चांगल्या आणि योग्य व्यवस्थापनासाठीसुद्धा महत्त्वाचा ठरतात.
अशारितीने, ॲक्मे इन्फिनिटीमधून, ज्वेलरी व्यवसायातील जटिल व्यवहारांची प्रॉफिटॅबिलिटी, फायदा किंवा तोटा, सहजपणे समजून येतो. ज्यामध्ये अकाउंटींग, इन्व्हेंटरी आणि ब्रँचेसचासुद्धा नीट विचार केलेला आहे.
Leave A Comment