3. दुकानांत स्टॉक लवकर जुळत नाही, नेहमी काहीं न काही गोंधळ होतोच! हा गोंधळ कसा टाळायचा?

3. दुकानांत स्टॉक लवकर जुळत नाही, नेहमी काहीं न काही गोंधळ होतोच! हा गोंधळ कसा टाळायचा?

सोने, चांदी, प्लॅटिनम असे मेटल (रॉ मटेरिअल), छोटे छोटे नाजूक तयार दागिने, कलर स्टोन्स, लूज डायमंड्स (वेगवेगळ्या व्हरायटी आणि किमतीचे), गिफ्ट आर्टिकल्स असा स्टॉक म्हणजे ‘आकार लहान पण किंमत महान!’ त्यामुळे सहाजिकच ज्वेलरी व्यवसायातील स्टॉक हा जोखमीचा विषय ठरतो आणि तो सांभाळताना सतर्कतेचे आव्हान आपोआपच तयार होते. परंतु, हे आव्हान पेलताना होणारा गोंधळ टाळायचा असेल तर पुढील चार गोष्टी करण्याची गरज आहे.

  1. स्टॉक ठेवायच्या प्रत्येक जागेचे कामकाज, स्वतंत्र विभाग म्हणून करणे.
  • विभागानुसार त्याला नाव, तशा व्यक्ती आणि तसे अधिकारही द्या.
  • स्टॉकच्या प्रत्येक जागी मुख्य म्हणून जबाबदार व्यक्तीची नेमणूक करा.
  • यामुळे प्रत्येक जागेवरील स्टॉकवर संबंधित जबाबदार व्यक्तीचे उत्तम नियंत्रण राहते.
  1. प्रत्येक आयटम आणि त्याच्या प्रत्येक छोट्यातल्या छोट्या पार्टला स्वतंत्र ओळख देणे.
  • सर्व आयटम्सना बारकोडिंग किंवा टॅगिंग करा.
  • बारकोड शक्य नसल्यास आयटम्सचा स्टॉक लॉट/बॅच/पॅकेट या स्वरुपात ठेवा.
  • यामुळे प्रत्येक आयटमची दुकानातील मुव्हमेंट चटकन ओळखता किंवा ट्रॅक करता येते.
  1. प्रत्येक स्टॉक किंवा त्याचा प्रकार, उचित आणि काटेकोर वर्क-फ्लोमधूनच हाताळणे.
  • वेगवेगळ्या स्टॉक प्रकारानुससार, तो हाताळण्याची स्वतंत्र कार्यपद्धती तयार करा.
  • सदर कार्यपद्धतीनेच संबंधित स्टॉक हाताळण्याची सवय लावा.
  • यामुळे एखादा स्टॉक कुठे आहे हे सतत कळत राहील आणि तो जबाबदार व्यक्तीकडेच राहील.
  1. स्टॉक दररोज, तसेच ठराविक कालांतराने वेगवेगळ्या पद्धतीने तपासत राहणे.
  • स्टॉक केवळ एकाच पद्धतीने न तपासता, संख्या, वजन, विभाग, व्यक्ती, यानुसारही स्टॉकची फेरतपासणी करत रहा.
  • दिवसातील ठराविक वेळ स्टॉक तपासण्यासाठी राखून ठेवा.
  • यामुळे स्टॉकची नोंद चटकन घेता येते आणि तो तितक्याच पटकन जुळवूनही होतो.

वरील चारही मुद्दे सहज आणि सोप्या पद्धतीने कार्यरत करण्यासाठी ॲक्मे इन्फिनीटीमध्ये वेगवेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण सोयी दिलेल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे काम करतात.

  1. स्टॉक ठेवायच्या प्रत्येक जागेचे कामकाज, स्वतंत्र विभाग म्हणून करण्यासाठी…
  • स्टॉकच्या प्रत्येक जागेचे स्वतंत्र विभाग, म्हणून स्वतंत्र लोकेशन सॉफ्टवेअरमध्ये तयार करता येते.
  • लोकेशन प्रमुखाला निरनिराळे व्यवहार ऑथोराईज्ड करण्याचे अधिकार देता येतात.
  • इन्फिनिटी, लोकेशननुसार स्टॉक रिपोर्ट दाखवत राहते.
  • लोकेशनच्या स्टॉकचे एसएमएस संबंधित जबाबदार व्यक्तीकडे जात राहतात.
  • यामुळे प्रत्येक छोट्या छोट्या विभागातील प्रत्येक छोट्या छोट्या स्टोअरेजवरती चांगले नियंत्रण राहते.
  1. प्रत्येक आयटम व त्याच्या प्रत्येक छोट्यातल्या छोट्या पार्टला स्वतंत्र ओळख देण्यासाठी…
  • इन्फिनिटी प्रत्येक आयटमला एक युनिक नंबर (लेबल नंबर) देते; जो बारकोड प्रिंट करून किंवा RFID द्वारे संबंधित आयटमला लावला जातो.
  • आयटमला, दागिन्यांना बारकोड लावणे शक्य नसल्यास त्यांच्या स्वतंत्र ओळखीसाठी पॅकेट्स, लॉट किंवा बॅच तयार करता येतात. आयटमच्या ॲट्रिब्यूटनुसार, किमतीनुसार पॅकेट्स तयार होतात.
  • मुख्यत्वे लुज आयटम्सचा स्टॉक हाताळण्यासाठी ही वैशिष्ट्यपूर्ण पॅकेट्स पद्धती खूप उपयोगी पडते. जसे लूज डायमंड्स, स्टोन्स इत्यादी. यामध्ये मटेरिअल एका पॅकेट मधून दुसर्‍या पॅकेटमध्ये देणे किंवा एखादे नवीन मटेरिअल, एखाद्या जुन्याच पॅकेटमध्ये क्लब करणे शक्य होते.
  • प्रत्येक नवीन एंट्रीचे नवीन पॅकेट तयार करता येते.
  1. प्रत्येक स्टॉक किंवा त्याचा प्रकार, उचित आणि काटेकोर वर्क-फ्लोमधूनच हाताळण्यासाठी…
  • प्रोक्युरमेंटमध्ये आलेल्या मालाकरिता इन्वर्ड मोड्यूल इन्फिनिटीमध्ये उपलब्ध आहे. प्रथम म्हणजे खरेदी बल्कमध्ये करता येते. आलेला माल बार कोडिंग होईपर्यंत लूज फॉर्ममध्ये असतो; जो लॉट-मॅनेजमेंटने हाताळला जातो. सदर माल टेस्टिंग आणि रिचेकिंगसाठी क्वॉलिटी चेकला पाठवता येतो. क्वॉलिटी चेकनंतर, योग्य मालाचे लेबलिंग होते. लेबलिंग झालेला माल हॉल मार्किंगला पाठवता येतो. अशाप्रकारे रिजेक्शन झालेले, क्वॉलिटी चेक ओके झालेले, त्यातून लेबलिंग झालेले मटेरिअल, असा ज्या-त्या लॉटचा प्रवास कुठल्याही क्षणी बघता येतो. यामुळे प्रत्येक विभागातील स्टॉकवर उत्तम नियंत्रण राहते. म्हणजे येथे केवळ आयटमनुसार रिपोर्टिंग न मिळता, लॉटनुसारही रिपोर्टिंग मिळते.
  • बार कोडिंग; प्रोक्युरमेंटच्या लॉटमध्ये झाल्यामुळे, खरेदी किंमत, पुरवठादाराची माहिती, ऑटोमॅटिक उपलब्ध होणे असे इतरही फायदे होतात.
  • जुन्या/मोडीच्या सोन्यासाठी रिफायनिंग मोड्यूल इन्फिनिटीमध्ये दिलेले आहे. यामध्ये घेतलेले सोने तीन पद्धतीने वर्गीकृत करता येते, जे पुढे ज्या त्या लोकेशनला पाठवता येते व तेथून ते मटेरियल पुढे मेल्टिंग, रिफायनिंग आणि लॅब सॅम्पल टेस्टिंग यांसाठी पाठवता येते.
  • काऊंटरवर एखादा दागिना डिसअसेंबल केल्यास डिसअसेंबल केलेला दागिना, त्याचा वेगळा भाग हे ऑटोमॅटिकली ठरवलेल्या पर्टिक्युलर लोकेशनला ट्रान्सफर होतात. जे तिथली संबंधित व्यक्ती ऑथोराईज करते.
  • ऑर्डरचा आयटमही सिलेक्ट केल्यावर, ऑर्डर कॉउंटरला (ऑर्डरच्या पेटीत) तो ट्रान्सफर होतो, ज्याचेही संबंधित व्यक्तीकडून ऑथोरायझेशन होते.
  1. स्टॉक दररोज तसेच ठराविक कालांतराने वेगवेगळ्या पद्धतीने तपासण्यासाठी…
  • दिवसाच्या शेवटी बार कोड स्कॅन करून किंवा RFID च्या साहाय्याने घेतलेला आयटमनुसार स्टॉक रिपोर्ट तंतोतंत टॅली करून घेता येतो. सदर स्टॉक कॉम्प्युटरला फीड करता येतो, ज्यावरून तो बरोबर आहे का? हे कॉम्पुटर चेक करतो. आणि त्यामुळे केवळ प्रिंटेड रिपोर्टवर अबवलंबून न राहता प्रत्येक काउंटरवर फिजिकल स्टॉक किती आहे हे सोप्या पद्धतीने समजते.
  • इन्फिनिटीमध्ये, दोन प्रकारे फिजिकल स्टॉक टेकिंग करायची सोय आहे! एक म्हणजे बारकोडनुसार दागिने अथवा आयटम स्कॅन करता येतात, ज्यासाठी पोर्टेबल डिव्हाइसमधून डायरेक्ट स्कॅन करून लेबल घेता येऊ शकतात. किंवा दुसरं म्हणजे वेईंग स्केलचा उपयोग करूनसुद्धा फिजिकल स्टॉक टेकिंग करता येते. ह्यामुळे एखादा जरी बार कोड अर्थात दागिना मिसिंग असेल तर तो चटकन निदर्शनास येतो.
  • फिजिकल स्टॉक टेकिंगचे शेड्युल तयार करून ठेवता येते. जेणेकरून योग्य वेळेला योग्य शेड्युलने फिजिकल स्टॉक टेकिंग घडत राहते आणि यामुळे ठराविक कालांतराने (शेड्युल्ड पद्धतीने) स्टॉक चेक होत राहतो, ज्यामुळे स्टॉक चेकिंगची काळजी करावी लागत नाही.

अशा पद्धतीने ॲक्मे इन्फिनिटीमधील निरनिराळ्या टूल्समुळे ज्वेलरी व्यवसायातील मौल्यवान स्टॉक कोणताही गोंधळ न होता, सतत टॅली राहतो. आणि त्यासाठी स्पेशल वेळही खर्च करावा लागत नाही!