3. दुकानांत स्टॉक लवकर जुळत नाही, नेहमी काहीं न काही गोंधळ होतोच! हा गोंधळ कसा टाळायचा?
acme2026-06-12T17:34:34+05:30सोने, चांदी, प्लॅटिनम असे मेटल (रॉ मटेरिअल), छोटे छोटे नाजूक तयार दागिने, कलर स्टोन्स, लूज डायमंड्स (वेगवेगळ्या व्हरायटी आणि किमतीचे), गिफ्ट आर्टिकल्स असा स्टॉक म्हणजे ‘आकार लहान पण किंमत महान!’ त्यामुळे सहाजिकच ज्वेलरी व्यवसायातील स्टॉक हा जोखमीचा विषय ठरतो आणि तो सांभाळताना सतर्कतेचे आव्हान आपोआपच तयार होते.